नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमितीत शेतमाल खरेदी विक्रीच्या माध्यमातून दैनंदिन ७ कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होत असते. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून उन्हाळा जाणवू लागल्याने सर्वत्र शेतमालाची आवक घटली आहे. त्यातच आता ग्रामीण भागात कोरोना विषाणूने डोकेवर काढल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. शेतकऱ्यांनीदेखील कोरोनाची धास्ती घेत शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणण्याचे प्रमाण कमी केल्याने तसेच कोरोना रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू करीत लॉकडाऊन जाहीर केल्याने व्यापारीवर्गाने देखील शेतमाल खरेदीकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचा परिणाम बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या दैनंदिन शेतमालाच्या आवकेवर झाला असून, परिणामी बाजारसमितीत आवक तर घटलीच शिवाय बाजारसमितीच्या उत्पन्नातदेखील घट झाली आहे.
इन्फो===
दहा दिवसांत ३० लाखांनी उत्पन्न घटले
कोरोना रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. कृषी उत्पन्न बाजारसमितीत शेतमालाची साधारणपणे ५० टक्केपर्यंत आवक घटल्याने बाजार समितीला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी दैनंदिन अंदाजे तीन लाख रुपये उत्पन्न घटले आहे.शेतकऱ्यांनी कोरोनाची धास्ती घेतल्याने सध्या बाजार समितीत शेतमालाची आवक कमी प्रमाणात होत आहे.
-देविदास पिंगळे, सभापती बाजारसमिती