घरोघरी, हॉटेल, बाजारपेठेतील दुकाने, सरकारी, तसेच खासगी कार्यालये येथे जार विक्रेते पाण्याचे वितरण करतात तसेच लग्न सराईत सर्वच मंगल कार्यालयात पाण्याच्या जारला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
लग्नसराई व उन्हाळा सुरू झाल्यानंतर हा व्यवसाय दुपटीने वाढतो, परंतु यंदा केवळ घरगुती पाणी वितरण १०० टक्के, तर इतर ठिकाणी फक्त १० टक्के विक्री सुरू आहे. सध्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे सर्व आस्थापना, मंगलकार्यालय व इतर खासगी कार्यालय बंद असल्याने येथील पाणी जार मागणी घटली आहे. त्यामुळे विक्रेत्यांच्या मासिक उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.
वीजबिल, पगार, भाडे किंवा कर्जाचे हप्ते, प्लांटचा खर्च, वाहतूक खर्च, कामगारांचा होणारा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी आहे, अशी स्थिती व्यावसायिकांची झाली आहे.
कोट....
साधारण उन्हाळ्यातील जारची विक्री ही दिवसाला २०० ते ३५० इतकी असायची. यंदा ती ५० ते ९० वर आली आहे. यामुळे आम्हाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.
- मयूर कोटमे, व्यावसायिक, चांदोरी
इन्फो
तालुक्यातील विक्रेते संख्या-८० ते १००
थंड पाणी जार किंमत-३० रुपये
साधे पाणी जार किंमत-२० रुपये
इन्फो
घरोघरी जाऊन पुरविले जाते पाणी
तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुकाने, शासकीय कार्यालये, बँका, खासगी कार्यालये आणि १०० ते १५० शाळा, महाविद्यालये, ३०हून अधिक मंगल कार्यालये हॉटेल आहेत. येथील विक्री ठप्प झाल्याने केवळ घरोघरी पाणी जार विक्री सुरू आहे. याचा फटका विक्रेत्यांना बसला आहे. ऐन हंगामात जारद्वारे पाणीविक्री मंदावल्याने हे व्यावसायिक चिंतेत आहेत.
फाेटो - ३० वॉटर
===Photopath===
300421\30nsk_20_30042021_13.jpg
===Caption===
फाेटो - ३० वॉटर