संगमेश्वर- शासकीय कोट्यातील डी.एल.एड. (डी.एड.)च्या प्रवेश अर्ज विक्रीला विद्यार्थ्यांचा अत्यंत अल्प प्रतिसाद मिळत असल्याने ‘विद्यार्थी देता का विद्यार्थी’ असे म्हणण्याची वेळ शासनावर आली आहे. दुसरीकडे प्रवेश अर्जाच्या शेवटी ‘प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना नोकरी मिळेलच याची खात्री नाही’ अशी टीप अर्जाच्या शेवटी देऊन शासनाने भविष्यातील बेरोजगारीपासून हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप विद्यार्थी व पालकांनी केला आहे.प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम (डी.एल.एड.) च्या प्रवेश अर्ज विक्रीला १ जूनपासून प्रारंभ झाला आहे. शासकीय कन्या शाळा, नाशिक व जे.ए.टी. अध्यापक विद्यालय, मालेगाव येथे अर्ज विक्री व स्वीकृतीची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मालेगाव येथून आजपावेतो फक्त २०१ अर्जांची विक्री झाली असून त्यातील फक्त ६६ अर्ज प्रवेशासाठी जमा झाले आहेत. सर्व प्रक्रियेस विद्यार्थी व पालकांनी अत्यंत थंड प्रतिसाद दिला आहे. अर्ज स्वीकृतीची अंतिम तारीख १६ जून आहे. विशेष म्हणजे मराठी माध्यमाच्या प्रवेशास तर खूपच कमी प्रतिसाद असल्याचे रविवारी जमा आलेल्या अर्जावरून दिसून येते. त्यामानाने उर्दू माध्यमांसाठी विद्यार्थ्यांचा बऱ्यापैकी प्रतिसाद आहे.सध्या नाशिक जिल्ह्यात प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमाचे ४८ महाविद्यालय कार्यरत आहेत. परंतु शिक्षक होण्यास भावीपिढी नाखूश असल्याचे दिसून येत आहे. याचा मोठा फटका महाविद्यालयांना बसणार आहे. पुरेशा विद्यार्थी संख्येअभावी काही महाविद्यालये बंद करावी लागतील की काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. या महाविद्यालयातील व्याख्याते, कर्मचारी यांना भविष्यात बेरोजगारीला सामोरे जावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रवेश अर्जाच्या शेवटच्या पानावर तळटीप देण्यात आली आहे. त्यात ‘राज्यात दि. २ मे २०१० नंतर शिक्षक भरती परीक्षा (सीईटी) झाली नाही. तसेच २०१३ मधील ‘शिक्षकपात्रता परीक्षेस ५९१९९० आणि २०१४ च्या शिक्षकपात्रता परीक्षस ३८८६६९ विद्यार्थी बसले होते.
डी.एड. प्रवेशाला अल्प प्रतिसाद
By admin | Published: June 14, 2015 11:51 PM