शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
2
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
3
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
4
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
5
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
6
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
7
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
8
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
9
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
10
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
12
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
13
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
14
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
15
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
17
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
18
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
19
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
20
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा

५० आॅक्सिजन बेडचे डेडीकेटेड कोविड सेंटर सुरु होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 9:05 PM

कळवण- तालुक्यात कोरोना बधितांची संख्या वाढत असल्याने आॅक्सिजन बेड ची संख्या वाढवण्यात येणार असून येत्या शनिवार पर्यंत कळवण तालुक्यासाठी अजुन एक डेडीकेटेड कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यात पन्नास आॅक्सिजन बेड ची सुविधा केली जाणार असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे बाह्य संपर्क अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.

ठळक मुद्देदिलासाकळवण: प्रशासकीय यंत्रणेच्या बैठकीत निर्णय

कळवण- तालुक्यात कोरोना बधितांची संख्या वाढत असल्याने आॅक्सिजन बेड ची संख्या वाढवण्यात येणार असून येत्या शनिवार पर्यंत कळवण तालुक्यासाठी अजुन एक डेडीकेटेड कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यात पन्नास आॅक्सिजन बेड ची सुविधा केली जाणार असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे बाह्य संपर्क अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.आमदार नितीन पवार यांच्या सुचनेनुसार सोमवारी (दि.28) कोल्हापूर फाटा येथील पंचायत समिती सभागृहात प्रशासकीय बैठक पार पडली. सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना,जिल्हा रुग्णालयाचे बाह्य संपर्क अधिकारी डॉ.अनंत पवार,तहसीलदार बी ए कापसे,गटविकास अधिकारी डी.एम.बहिरम,पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ,तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.सुधीर पाटील,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.निलेश लाड, अभोणा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दीपक बहिरम उपस्थित होते.गेल्या महिन्याभरापासून रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने नव्याने कोविड सेंटर सुरु करावे अशी सूचना आमदार नितीन पवार यांनी जिल्हाधिकारी व आरोग्य यंत्रणेला केली होती शिवाय नागरिकांसह छावाचे तालुकाप्रमुख प्रदीप पगार यांनी याबाबत प्रशासनाकडे मागणी केली होती.त्यामुळे आजच्या बैठकीत मानुर येथील कोविड केयर सेंटर जवळील इमारतीत 50 आॅक्सिजन बेडचे डेडीकेटेड कोविड सेंटर शनिवार पर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.कळवण शहरात रुग्ण संख्या वाढत असताना कंटेंनमेंट झोन बाबत कडक भूमिका घेतली जात नसल्याबद्दल बैठकीत वरिष्ठ अधिका?्यांनी नाराजी व्यक्त केली.कळवण शहरात कडक अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले तर कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचणी उद्भवू नयेत यासाठी स्वतंत्र शववाहिनी अधिग्रहित करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.सुधीर पाटील व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.निलेश लाड यांनी आरोग्य कमर्चारी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी केली.आरोग्य कमर्चारी नसल्याने नवीन कोविड सेंटर सुरु करण्यास अडचणी निर्माण होत आहे. (२८कळवण१)--मानुर येथील कोविड केयर सेंटर शेजारी असलेल्या इमारतीत तत्काळ पन्नास आॅक्सिजन बेड चे डेडीकेटेड कोविड सेंटर सुरू केले जाणार आहे.इतर समस्याही लवकरच सोडवल्या जातील- डॉ.अनंत पवार,बाह्य संपर्क अधिकारी,जिल्हा रुग्णालय,नाशिक--कळवण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आरोग्य विभागातील रिक्त पदे तात्काळ भरावी, कोविड सेंटरमधील व्?हेंटिलेटर व खाटांची संख्या वाढवावी, आरोग्य विभागाला पुरेशा प्रमाणात पीपीई किट, मास्?क, सॅनिटायझर, औषधे व साहित्य उपलब्ध करून द्यावे यासाठी माझा प्रयत्न आहे.जनतेच्या आरोग्य सेवेसाठी मी व प्रशासन तत्पर असून नागरिकांच्या सक्षम सहकार्याची आवश्यकता आहे.- नितीन पवार,आमदार

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल