इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे आरोग्य विभागाच्या चुकीच्या जागेवर बांधलेल्या इमारतीचा आरोग्य विभागाने ताबा न घेतल्याने ती इमारत २० वर्षांपासून केलेल्या बांधकामापासून ते आजतागायत तशीच पडून आहे. ही इमारत मोडकळीस आली असून परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याच पार्श्वभूमीवर पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे व उपसरपंच बाळासाहेब आमले यांच्यासह माजी सदस्य कैलास धांडे यांनी कल्पतरू फाउंडेशनकडे पाठपुरावा केला होता. यासाठी कंपनी व्यवस्थापनाचे मुख्य अधिकारी नीळकंठेश्वर, सारंग पांड्ये, बिरेंद्र रॉय, संतोष मोरे यांनी पाडळी देशमुख गावात येऊन सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले व ग्रामस्थांसमवेत पाहणी केली होती. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची व ग्रामस्थांची बैठक घेऊन दवाखान्यासाठी ६०० स्क्वेअर फूट सर्व सुविधांयुक्त इमारत मंजूर केली. या इमारतीचे भूमिपूजन करण्यात येऊन रुग्णवाहिकादेखील सुपुर्द करण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, वाडिव-हेचे पोलीस निरीक्षक अनिल पवार, खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले, ग्रामविकास अधिकारी संजय निरभवणे, आदी उपस्थित होते.
-----------------
फोटो- ११ पाडळी देशमुख
पाडळी देशमुख येथे कल्पतरू फाउंडेशनच्या वतीने आरोग्य उपकेंद्रासाठी रुग्णवाहिकेची चावी सरपंच खंडेराव धांडे यांच्याकडे देऊन लोकार्पणप्रसंगी खासदार हेमंत गोडसे समवेत आमदार हिरामण खोसकर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, गोरख बोडके, कल्पतरू फाउंडेशनचे पदाधिकारी व ग्रामस्थ.
110921\11nsk_27_11092021_13.jpg
फोटो- ११ पाडळी देशमुख पाडळी देशमुख येथे कल्पतरु फाऊंडेशनच्या वतीने आरोग्य उपकेंद्रासाठी रूग्णवाहिकेची चावी सरपंच खंडेराव धांडे यांच्याकडे देऊन लोकार्पणप्रसंगी खासदार हेमंत गोडसे समवेत आमदार हिरामण खोसकर, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, गोरख बोडके, कल्पतरू फाउंडेशनचे पदाधिकारी व ग्रामस्थ.