डांगसौंदाणे : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत येथील वीर जवान विजय बापूजी सोनवणे यांच्या स्मरणार्थ स्मारक व उद्यान लोकार्पण सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केदा मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून राहुल सोनवणे, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देवरे, माजी सभापती संजय सोनवणे, डॉ.शेषराव पाटील, माजी सरपंच विजय सोनवणे, सरपंच जिजाबाई सोनवणे, पंढरीनाथ सोनवणे, वैशाली बधान, उपसरपंच सुशीलकुमार सोनवणे, महेश देवरे उपस्थित होते.येथील दिवंगत वीर मराठा बटालियनचे जवान विजय बापूजी सोनवणे यांचा आसाममधील तेजपूर सेक्टरमध्ये डिसेंबर, २०१८ मध्ये अकाली मृत्यू झाला होता. यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अमर जवान स्मारक व उद्यानाची निर्मिती ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. या स्मारक व उद्यानाचा लोकार्पण सोहळा खासदार डॉ.सुभाष भामरे व आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सैन्य दलातील जवानांनी व मान्यवरांच्या हस्ते स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. वीरपत्नी वैशाली सोनवणे, आई वडील व भाऊ यांच्या हस्ते ही पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.याप्रसंगी बापू बधान, साहेबराव बोरसे, सोपान सोनवणे, जगदीश सोनवणे, मुन्ना सोनवणे, उदय सोनवणे, अनंत दीक्षित, वैभव बोरसे, राजेंद्र चव्हाण, दिगंबर बदाने, आबाजी सोनवणे, योगेश सोनवणे, उपसरपंच नंदू बैरागी, बापू खैरनार, सोमनाथ साबळे, ग्रामसेवक सचिन सूर्यवंशी सेवानिवृत्त सैनिक संदीप सोनवणे, कैलास आहिरे, सुभाष चव्हाण आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
वीर जवान विजय सोनवणे यांच्या स्मारक व उद्यान लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 10:50 PM
डांगसौंदाणे : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत येथील वीर जवान विजय बापूजी सोनवणे यांच्या स्मरणार्थ स्मारक व उद्यान लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
ठळक मुद्देअमर जवान स्मारक व उद्यानाची ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने निर्मिती