सामान्य रुग्णालयात टेमसेक फाउंडेशन इंटरनॅशनल कंपनी, सिंगापूर यांच्याकडून रत्ना निधी स्वयंसेवी संस्थेमार्फत सामाजिक दायित्व निधीतून प्राप्त झालेल्या पाच ऑक्सिजन कॉन्संट्रेटर यंत्राचे लोकार्पण भुसे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल, उपमहापौर नीलेश आहेर, स्थायी समितीचे सभापती राजाराम जाधव, बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे, महानगरपालिकेचे आयुक्त दीपक कासार, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. हितेश महाले, डॉ. गौतम शीलवंत, समाजसेवा अधीक्षक विकास लोधे यांच्यासह पदाधिकारी व सामान्य रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.
भुसे पुढे म्हणाले, कोरोनाच्या कालावधीत औद्योगिक वापरासाठी लागणारा ऑक्सिजन राखीव ठेवत रुग्णालयांना पुरवठा करण्यासाठी शासन स्तरावरून विशेष प्रयत्न करण्यात आले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील आरोग्य प्रशासनाने चांगले योगदान दिले असल्याचेही भुसे यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. हितेश महाले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मनोहर बच्छाव, खालीद सिकंदर, शफीक मेंबर, प्रमोद शुक्ला, रामा मिस्त्री, शेख शफिक, मसूद कंपाऊंड, अलीम पटेल, हाफीज हबीब मियाजी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
इन्फो
नवीन रुग्णालय प्रस्तावित
सामान्य रुग्णालयामार्फत चांगली रुग्णसेवा देताना रुग्णालयाच्या परिसर स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेता नवीन मोठे रुग्णालय प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे सांगत त्यासाठी महानगरपालिकेमार्फत शहराच्या केंद्रभागी जागा उपलब्ध करण्याचे निर्देशही मंत्री भुसे यांनी यावेळी दिले.