शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
2
राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
3
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
4
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
5
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
6
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
7
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
8
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
9
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
10
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
11
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
12
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
13
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
14
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
15
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
16
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
17
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
18
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
20
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 

घोटीत ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 12:08 AM

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात ३०० लीटर प्रति मिनिट निर्मितीचा नैसर्गिक हवेतून ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या ऑक्सिजन प्लांटचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हिरामण खोसकर होते.

ठळक मुद्देभुजबळांची उपस्थिती : ऑक्सिजन कमी पडू न देण्याची ग्वाही

घोटी : इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात ३०० लीटर प्रति मिनिट निर्मितीचा नैसर्गिक हवेतून ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या ऑक्सिजन प्लांटचा शुभारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार हिरामण खोसकर होते.घोटी ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात आयोजित समारंभाप्रसंगी इगतपुरी तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्याला ऑक्सिजन कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही भुजबळ यांनी दिली. विविध अत्याधुनिक प्लांटच्या माध्यमातून ऑक्सिजन निर्मितीसाठी नाशिक जिल्हा सतर्क असून, आरोग्याच्या दृष्टीने जिल्ह्याला ऑक्सिजनसह मुबलक सेवा पुरविल्या जाणार आहेत. कोरोनाचे संकट अजून टळले नसून, सर्वांनी सजग राहण्याची गरज आहे. महामार्गावरील रस्त्यांबाबत दुरवस्था झाली असली तरी काही दिवसांत रस्ते खड्डेमुक्त होतील. तसेच घोटी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांच्या मागणीला पोकळ आश्वासन देणार नाही. निधीच्या माध्यमातून लवकरच विचार करू, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या ऑक्सिजन प्लांटमुळे इगतपुरी ग्रामीण रुग्णालय ऑक्सिजन निर्मितीत स्वयंपूर्ण होऊन येथील ऑक्सिजनची कमतरता दूर होण्यास मदत होणार असल्याचे आमदार खोसकर यांनी सांगितले.ऑक्सिजन प्लांटच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार शिवराम झोले, कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य प्रशासक संदीप गुळवे, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक गोरख बोडके, रामदास भोर, संजय आरोटे, सचिन गोणके, पांडुरंग वारूगसे, शिवा काळे, निलेश कडू, पांडुरंग शिंदे, संपत काळे, तुकाराम वारघडे, खंडू परदेशी, सचिन तारगे, नाशिक विभागाचे उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सदावर्ते, डॉ. राहुल वाघ, डॉ. अविनाश गोरे, डॉ. किरण कानवडे, डॉ. सचिन म्हाकने, डॉ. प्रीती वाडेकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे, घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा घंदास, पोलीस हवालदार कांगने आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल