कळवण : तालुक्यातील दरेगाव वणी, चिखली, कळवण खुर्द, मानूर, जिरवाडे, शिरसमणी, ओतूर, भुसणी, निवाणे, भेंडी, कळवण येथे विविध विकासकामांचा शुभारंभ, लोकार्पण सोहळा आमदार नितीन पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना पवार म्हणाले, स्व. ए. टी. पवार यांनी विकासकामांची शिकवण दिली आहे, त्यामुळे शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मतदारसंघात निधी मंजूर करण्यात यश आले. अर्थसंकल्प, नाबार्ड, आदिवासी उपयोजना, ठक्कर बाप्पा, रस्ते व पूल दुरुस्ती, डोंगरी विकास, जनसुविधा, मूलभूत योजना व आमदार निधी या वेगवेगळ्या योजनामधून ९३ कोटी ७० लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात यश आले. त्यामुळे प्रत्येक गावात विकासकामे करणे हेच माझे ध्येय आहे, अशी त्यांनी दिली.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद गटनेते यशवंत गवळी, बाजार समिती सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, ज्येष्ठ नेते रवींद्र देवरे, उपसभापती विजय शिरसाठ, भूषण पगार, हेमंत पाटील, संतोष देशमुख, शिवाजी चौरे, अतुल देवरे, विलास रौंदळ, सुनील देवरे आदी होते.
-------------------------
यावेळी दरेगाव वणी, चिखलीपाडा येथे सभामंडप बांधकाम करणे, साकोरेपाडा येथे संरक्षक भिंत बांधकाम करणे, कोल्हापूर फाटा ते कळवण खु. रस्त्याचे बांधकाम करणे, कोल्हापूर फाटा येथे पाणीपुरवठा करणे, साकोरेपाडा ते जीरवाडे रस्ता बांधकाम करणे, शिरसमणी सावळदरा सटवाईवाडी रस्त्याचे बांधकाम करणे,शिरसमणी व कुंडाणे, ओतूर, भुसणी येथे गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे, ओतूर मोरेवस्ती रस्ता बांधकाम करणे, कळवण खुर्द येथील रस्ता बांधकाम करणे कळवण येथे मोठ्या पुलाचे बांधकाम करणे आदी कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा करण्यात आला.
-------------------
चिखली येथे सभामंडप लोकार्पणप्रसंगी आमदार नितीन पवार, यशवंत गवळी, राजेंद्र भामरे, प्रकाश राऊत, सुभाष राऊत, अतुल देवरे, रवी सोनवणे आदी. (१५ कळवण १)
150721\15nsk_3_15072021_13.jpg
१५ कळवण १