पिंपळगाव बसवंत : शहरातील श्री संत जनार्दन स्वामी भक्त परिवार व ग्रामस्थांच्यावतीने शिवाजीनगर येथील श्री महारूद्र हनुमान मंदिर, श्री शनी मंदिर, श्री सप्तशृंगी माता मंदिर व श्री संत जनार्दन स्वामी पर्णकुटीयासमोर त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त मंदिराच्या प्रांगणात १२ हजार दीप प्रज्वलित करण्यात आले.दरवर्षी दीप संख्येत वाढ करण्यात येते. नासिक जिल्हयातील सर्वात मोठा दिपोत्सव असल्याचा दावा संयोजकांनी केला. यामध्ये शुभ चिन्ह सजावट, आकर्षक दिपस्तंभानी परिसरात झगमगाट करण्यात आला. त्यामुळे पोर्णिमेच्या प्रकाशात हजारो दिव्यांनी परिसर उजळून निघाला. जमिनीवर दिव्यांची आरास व वर विविध रंगांची आकाशकंदीलांनी नेत्रदीपक दृश्य पाहावयास मिळाले. गेल्या १५ दिवसापासून कार्यक्र माची तयारी सुरु होती.या दिपोत्सवात नंदकुमार सोनवणे, अनिल पठाडे, राकेश आंबेकर, अशोक शिंदे, भाऊलाल वर्पे, बाळासाहेब आंबेकर, प्रतिक आकडे, सागर संधान श्री संत जनार्दन स्वामी मित्र मंडळ, महिला मंडळ व भाविकांनी दिपोत्सवात सहभाग नोंदविला. या कार्यक्रमास सरपंच अलका बनकर, ग्रामपंचायत सदस्य सत्यभामा बनकर, सतीश मोरे आदी उपस्थित होते.
१२ हजार दिव्यांनी साकारला दीपोत्सव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 1:30 PM