पिंपळगाव बसवंत : आपले शरीर सदृढ आणि निरोगी असणे ही काळाची गरज आहे. म्हणून आपले शरीर सदृढ ठेवण्याकरिता तरुण वर्ग जिमच्या माध्यमातून मोठी काळजी घेतात आणि व्यायाम हा निरंतर सुरू ठेवून आपले शरीर सदृढ करतात. व्यायाम करून शरीर सुदृढ करण्याची हीच गरज लक्षात घेऊन तरुणांच्या व्यायामातील कलागुणांना वाव मिळण्याकरिता पिंपळगाव बसवंत येथील ओम बजरंग फिटनेस क्लब व एसके न्यूट्रिशियन यांच्या सहकार्याने पिंपळगाव हायस्कूल मैदानावर रविवारी (दि. ८) उत्तर महाराष्ट्र श्री स्पर्धा यशस्वी संपन्न झाली.या स्पर्धेत पाच जिल्ह्यातील १५० पेक्षा जास्त तरुणांनी सहभाग घेतला होता. यामध्ये प्रथम पारितोषिक नाशिकचा ह्यदीपक डंबाळे' हा उत्तर महाराष्ट्र श्री ठरला, बेस्ट पोजर अश्विन पांचाळ (४३) आणि एकूण ७ गटातील स्पर्धकांना टी-शर्ट, सप्लीमेंट, प्रमाणपत्र प्रत्येक स्पर्धकाला बहाल करण्यात आले.सर्वसामान्य घरातील दोन युवक संकेत मोंडे आणि संकेत जाबरे व सर्व जय बजरंग फिटनेस टीमने एक दिव्य सोहळा पिंपळगावच्या ह्यद्राक्षपंढरीह्ण नगरीत घडवून आणला.स्पर्धेचे आयोजक म्हणून जबाबदारी सूत्रसंचालन आणि संपूर्ण गोष्टीचे नियोजन तसेच ह्यउत्तर महाराष्ट्र श्रीह्ण टायटल पुरस्कार बहाल करण्याचा मानसन्मान प्रवीण घुमरे यांना देण्यात आला. स्पर्धेतील विजयी उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते भास्कर बनकर, गोविंद कुशारे, पंचायत समिती सदस्य राजेश पाटील, मदन घुमरे, राजेश वराडे, राजेंद्र सातपूरकर, दीपक गवळी, केशव बनकर, धनंजय काळे, मनोज शिंदे, किरण जाधव, वाघ, जिल्हा परिषद सदस्य ज्योती वाघले, अजिंक्य वाघ, डॉ. कुयटे, प्रकाश दाभाडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमास बॉडी बिल्डिंग असोसिएशन नाशिकचे हेमंत साळवे, सातपूर यांचे सहकार्य लाभले.
नाशिकचा दीपक डंबाळे ह्यउत्तर महाराष्ट्र श्रीह्णचा मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2022 12:13 AM
पिंपळगाव बसवंत : आपले शरीर सदृढ आणि निरोगी असणे ही काळाची गरज आहे. म्हणून आपले शरीर सदृढ ठेवण्याकरिता तरुण ...
ठळक मुद्देपिंपळगावच्या ह्यद्राक्षपंढरी'श्रीह्ण स्पर्धा उत्साहात : उत्तर महाराष्ट्रातील १५० युवकांचा सहभाग