संशयित दीपक याने बुधवारी (दि.३१) रोजी सायंकाळी कोरोनाबाधित असलेल्या रुग्णाला रुग्णालयात बेड मिळत नसल्याचा आरोप केला. तसेच त्यास ऑक्सिजन सिलिंडरसह मनपा मुख्यालय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणून खुर्चीवर बसविले होते. साथरोग फैलावत असताना अशा प्रकारे निष्काळजीपणे वर्तन करत त्या रुग्णाच्या मृत्यूला जबाबदार ठरल्याचा ठपका डोके याच्यावर ठेवण्यात आला. त्यामुळे सरकारवाडा पोलीस ठाण्यात डोकेविरोधात साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार तसेच भारतीय दंड विधान कलम २६९, २७० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू करून अनेकांचे जाबजबाब घेण्यात आले. मनपानेही स्वतंत्र समिती नेमून चौकशी केली. रुग्णांलयांमध्येही चौकशी करण्यात आली. दरम्यान, रविवारी (दि.४) सायंकाळी दीपकला अटक करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी (दि.५) त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दीपक डोके यास पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:13 AM