राजापूर :-येवला तालुक्यातील राजापूर परिसरात पाण्याच्या शोधात आलेल्या हरणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येवला तालूक्यातील राजापूर व परिसरात दरवर्षी शेकडो हरिणाचा मूत्यू या ना त्या कारणाने होत असतो. माञ विहिरीत पडून हरणाचा मुत्यू झाल्याच्या घट्ना जास्त प्रमाणात घडत आहे.राजापूर - ममदापूर हे वनविभागाचे राखीव वनसंवर्ध आहे. याठिकाणी हरणासाठी वन विभागाने पाच एकर क्षेत्रावर तार कंपाउंड केलेले आहे. याठिकाणी जखमी हरणाना तेथे सोडण्यात येते वन विभागाने राखीव वनसंवर्धनासाठी खर्च केलेले आहे. माञ हरणाचा मुत्यू कधी थांबणार अशा प्रश्न ग्रामस्थांना पडलेला आहे. राजापूर व परिसरात हजारोच्या संख्येने हरिण, काळविट पाहवयास मिळते. माञ या हरणाचा मुत्यू हा विहिरीत पडून च होतो कारण येथील विहिरना कठडे नाही. राजापूर येथे विहिरीत मादी जातीचे हरणाचा मुत्यू झाला येथील गट नंबर 280/2 श्रीधर सटवा वाघ यांच्या विहिरीत हरिणाचा मुत्यू आढळले येथील शेतकरी मळयात गेले असता दूपारी विहिरीवर गेले असता त्यांना हरिण विहिरीत मरण पावलेले दिसले.
पाण्याच्या शोधात आलेल्या हरणाचा विहिरीत पडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 5:45 PM