दिंडोरी : उमराळे बुद्रुक येथे शेतकºयांसाठी आयोजित चर्चासत्र कार्यक्रमात जेवणातून १५० हून अधिक शेतकºयांना विषबाधा झाली असून, ८५ शेतकरी उपचार घेत आहे. मृत पहिलवान अतुल केदार यांच्यावर गुरुवारी उमराळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जेवणानंतरच्या मठ्ठ्याने त्यांचा घात केला. चर्चासत्र आयोजित करणाºया कंपनीचे व्यवस्थापक सुनील मुळे, केटरिंग चालक सुनील वडजे व आचारी सीताराम वाकळे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, सुनील वडजे व सीताराम वाकळे यांना अटक झाली आहे.कंपनीने संकरित कार्यक्रम आयोजित केले होते. चर्चासत्र आटोपून उपस्थित शेतकºयांनी जेवण केले. जेवणात भात, जिलेबी, मठ्ठा आदी पदार्थ शेतकºयांनी खाल्ले. मृत अतुल यांना त्यातूनच विषबाधा झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. ज्यांनी जास्त मठ्ठा प्यायला त्यांना जास्त त्रास झाला. जिल्हा रुग्णालयात १२, दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात १३, उमराळे केंद्र येथे ५ ,माहुली हॉस्पिटल दिंडोरी येथे ४, क्षीरसागर हॉस्पिटल दिंडोरी येथे ९, नाशिक येथील खासगी हॉस्पिटल येथे १४ , अपोलो हॉस्पिटल ११, सिनर्जी हॉस्पिटल १०, संजीवनी हॉस्पिटल ३, मॅग्नम हॉस्पिटल २, यशवंत हॉस्पिटल २ असे ८५ शेतकरी उपचार घेत आहेत. दिंडोरी तालुक्यातील उमराळे बुद्रुक येथे कीटकनाशक कंपनीच्या मेळाव्यात जेवल्यानंतर विषबाधा झालेल्या रुग्णांची प्रकृती आता पूर्वपदावर येत असून, गुरुवारी (दि.९) जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल उदय सांगळे यांच्यासह समाजकल्याण सभापती सुनीता रामदास चारोस्कर यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन विषबाधित रुग्णांची विचारपूस केली. बुधवारी दुपारनंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जवळपास उमराळे गावातील शंभर ते दीडशे जणांना विषबाधा होऊन त्यात एकाला प्राण गमवावा लागला. विषबाधित काही रुग्णांना म्हसरूळच्या सिनर्जी तसेच आडगाव नाक्यावरील अपोलो या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. काही जणांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालय व अपोलो खासगी रुग्णालयातील विषबाधित रुग्णांची गुरुवारी दुपारी अध्यक्ष शीतल सांगळे, सभापती सुनीता चारोस्कर यांनी प्रकृतीची विचारपूस केली. जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी अध्यक्ष शीतल सांगळे व सभापती सुनीता चारोस्कर यांनी रुग्णांच्या तब्येतीची माहिती देत रुग्णांची प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले.
सदोष मनुष्यवध : उमराळे विषबाधा प्रकरणी कंपनी व्यवस्थापक व केटरिंग चालकावर गुन्हा मठ्ठ्याने केला पहिलवानाचा घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 1:04 AM
उमराळे बुद्रुक येथे शेतकºयांसाठी आयोजित चर्चासत्र कार्यक्रमात जेवणातून १५० हून अधिक शेतकºयांना विषबाधा झाली असून, ८५ शेतकरी उपचार घेत आहे. मृत पहिलवान अतुल केदार यांच्यावर गुरुवारी उमराळे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. जेवणानंतरच्या मठ्ठ्याने त्यांचा घात केला. चर्चासत्र आयोजित करणाºया कंपनीचे व्यवस्थापक सुनील मुळे, केटरिंग चालक सुनील वडजे व आचारी सीताराम वाकळे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, सुनील वडजे व सीताराम वाकळे यांना अटक झाली आहे.
ठळक मुद्देविषबाधा झाल्याने उपचारापूर्वीच मृत्यू रुग्णांची प्रकृती आता पूर्वपदावर विषबाधित रुग्णांची विचारपूस