शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

नाशकात होणार डिफेन्स इनोव्हेशन हब : सुभाष भामरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 6:35 PM

 संरक्षण अन्‌ हवाई उत्पादन क्षेत्रातील उत्पादनामधील संशोधनाला चालना मिळावी म्हणून नाशिकमध्ये "डिफेन्स इनोव्हेशन हब'ची निर्मिती करण्यात येणार असून त्यामुळे नाशिकच्या औद्योगित विकासाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होई असा विश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला आहे

ठळक मुद्देनाशिकमध्ये होणार "डिफेन्स इनोव्हेशन हब'ची निर्मिती औद्योगिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा विश्वास

नाशिक : संरक्षण अन्‌ हवाई उत्पादन क्षेत्रातील उत्पादनामधील संशोधनाला चालना मिळावी म्हणून नाशिकमध्ये "डिफेन्स इनोव्हेशन हब'ची निर्मिती करण्यात येणार असून त्यामुळे नाशिकच्या औद्योगित विकासाला चालना मिळून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होई असा विश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला आहे. राज्यात "डिफेन्स हब'ची क्षमता असलेल्या नाशिकमध्ये संरक्षण व हवाई उत्पादन क्षेत्रातील संधीबद्दल शुक्रवारी (दि. 15) चर्चासत्र होत असून या माध्यमातून नाशिकच्या उद्योजकांना संरक्षण क्षेत्राशी निगडीत विविध उत्पादने व त्यांच्या गुवत्तेविषयी मार्गदशर्न होणार असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.यापूर्वी कोईमतूर येथे अशाप्रकारे डिफेन्स इनोव्हेशन हबची सुरुवात झाली असून आता नाशिकमध्येही संरक्षण क्षेत्राशी निगडीत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी डिफेंस इनोव्हेशन हब विकसित कऱण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशात संरक्षण सामग्रीच्या उत्पादनाला चालना देत भारताला उदयोन्मुख संरक्षण उत्पादनाचे हब बनविण्याची भूमिका केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने घेतली असून, त्याअंतर्गत महाराष्ट्रात औद्योगिक विकासाला पूरक ठरेल, असे संरक्षण व हवाई उत्पादन क्षेत्रातील संधी या विषयावर नाशिकमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून खासगी संस्थांनी संरक्षण भांडारविषयक तयार केलेल्या साहित्याच्या गुणवत्तेची हमी देण्यासाठी त्रयस्थ तपासणी एजन्सी व व्यापार प्राप्ती योग्य सूट प्रणालीचाही या चर्चासत्राच्या निमित्ताने शुभारंभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग असून ते पुणे व मुंबईसारख्या औद्योगिक क्षेत्रासाठी मुख्य पुरवठादार होऊ शकतात. तसेच भारतीय सैन्याचे शस्त्रास्त्र व युद्धसामग्री उत्पादन स्वदेशी करण्यासाठी हे चर्चासत्र उपयोगी ठरेल, असा विश्वास डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, या चर्चासत्रात आॅर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड (ओएफबी), संरक्षण संशोधन व विकास प्रतिष्ठान (डीआरडीओ), डायरेक्टर जनरल क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स (डीजीक्युए) डायरेक्टर जनरल एअर क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स (डीजीएक्यूए), संरक्षण क्षेत्रातील कार्यरत एचएएल, जीएसएल अशा सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांसह खासही उद्योगांचे प्रतिनिधीही या चर्चासत्रात सहभागी होणार असून, औद्योगिक क्षेत्रातील निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चरर आणि लघुउद्योग भारती आदी संघटनांचाही चर्चासत्रात सहभाग असणार आहे. नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना मिळावी यासाठी डॉ. प्रशांत पाटील यांनी हे चर्चासत्र घडवून आणण्यासाठी पाठपुरावा केला होता.वरिष्ठ अधिकारी, उद्योजकांचे मार्गदर्शनचर्चासत्रात कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रिज (सीआयआय)चे पश्चिम विभाग अध्यक्ष पिरुझ खामबत्ता यांच्यासह सोसायटी आॅफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅ क्चरर्सचे महासंचालक निवृत्त लेफ्टनंट जनरल सुब्रता साहा, सोसायटी आॅफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅ क्चरर्सचे अध्यक्ष बाबा कल्याणी, भारतीय हवाई दलाचे एअरमार्शल एस.बी. देव, भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल देवराज अनबू, राज्याच्या लघु व मध्यम उद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन मार्गदर्शन करणार असून, आर्टिलरी स्कूल, नौदल, हवाई दल व लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. 

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागNashikनाशिकministerमंत्री