नाशिक : नवरात्रोत्सव घराघरात देव देवतांचे घट बसविण्यात येतात. त्यासाठी लागणारे घट तयार करण्याचे काम कारागिरांकडून सुरू आहे. सध्या विविध कलाकुसरीने सजावट केलेले गुजराती घट सज्ज झाले असून, बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. गुजरातचे नेहमीच वेगळेपण राहिले आहे. त्यात गुजराती घट विविध कलाकुसरींचा वापर करून बनविण्यात येत आहेत. नवरात्रोत्सव अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपल्याने कारागिरांनी घटासह नवरात्रीचे इतर साहित्य बनविण्याला वेग दिला आहे. विशेषत: गुजराती घट अनेक प्रकारचे तयार केले जात असून, त्यासाठी काच, स्टोन, दोरी, रंगीबेरंगी प्लॅस्टिक फुलांचा वापर करून सजविण्यात आले आहे. ७० रुपयांपासून तीन हजार रुपयापर्यंत घट उपलब्ध असल्याचे विक्रेता ममता राजेसर्वया यांनी सांगितले. रामकुंड परिसरालगत विक्रीसाठी घट दाखल झाले असून, गुजरातीमध्ये या घटाला गर्भा म्हटले जाते. लोकांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन घटाची रचना, त्यातील कलाकुसरमध्ये आधुनिकता आणली गेल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी) तयारी नवरात्रोत्सवाची : नवरात्रोत्सवासाठी लागणारे विविध प्रकारचे घट बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, या घटांना रंगरंगोटी आणि सजावट करणे सध्या सुरू आहे.
नवरात्रोत्सवासाठी कलाकुसरींचे घट
By admin | Published: September 30, 2015 12:23 AM