नाशिक : राज्यातील महापौर, नगराध्यक्षांना सहा महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला, तरी उपनगराध्यक्षांबाबत कोणतेही स्पष्ट निर्देश दिले नसल्याने नगराध्यक्षांबरोबर उपनगराध्यक्षांनाही मुदतवाढ दिल्याचा त्यातून विद्यमान लोकप्रतिनिधींनी अर्थ काढायला सुरुवात केली आहे; मात्र शासनाचे आदेश संदिग्ध असल्याने उपनगराध्यक्षांच्या निवडीबाबत प्रशासनाने मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय घेतला आहे. चालू महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बहुतांशी महापौर, नगराध्यक्षांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात येणार असल्याने त्यांच्या निवडीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यातील येवला, मनमाड, नांदगाव, सिन्नर, सटाणा व भगूर या सहा नगरपालिका अध्यक्षांच्या निवडीसाठी येत्या मंगळवारी प्रत्येक नगरपालिकेची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. तत्पूर्वीच गेल्या आठवड्यात राज्य विधिमंडळ अधिवेशनातच महापौर, उपमहापौर, नगराध्यक्ष यांचा कार्यकाळ आणखी सहा महिने वाढविण्याचा निर्णय घेतल्याने विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण, तर या पदासाठी इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यापेक्षाही उपनगराध्यक्षांच्या बाबतीत शासनाने आपल्या आदेशात काहीच नमूद न केल्यामुळे त्याबाबत संभ्रम वाढला आहे. नगराध्यक्ष निवडीनंतर लगोलग उपनगराध्यक्षांच्याही निवड करण्यात आल्या होत्या. नगराध्यक्षांना मुदतवाढ देताना शासनाने कोेठेच उपनगराध्यक्षांच्या मुदतवाढीचा उल्लेख केलेला नाही; उलट उपमहापौरांचा या आदेशात उल्लेख असल्यामुळे मुदतीत उपनगराध्यक्षांची निवड न घेतल्यास त्याचा ठपका प्रशासनावर बसणार असल्यामुळे प्रशासकीय पातळीवर धावपळ सुरू झाली आहे. गाय चोरणाऱ्यास अटकंमालेगाव : कत्तलीसाठी तीन हजार रुपये किमतीची काठेवाडी गाय रस्त्याने घेऊन जाणाऱ्या शेख कलीम शेख रहीम (२२) रा. स. नं. १५, मोतीतालाब, कमालपुरा यास आयेशानगर पोलिसांनी अटक केली. काल पहाटे ६ वाजेच्या सुमारास हजारखोली भागातील मदीना कटपीस दुकानासमोर ही कारवाई करण्यात आली. पोलीस नाईक मनोज सोनवणे यांनी फिर्याद दिली. अधिक तपास हवालदार ठोके करीत आहेत.