नाशिकरोड : रेल्वे प्रशासनाने ऐन दिवाळीसारख्या मोठ्या सणामध्ये विविध कामांसाठी घेतलेल्या ब्लॉकमुळे काही रेल्वे रद्द तर लांब पल्ल्याच्या रेल्वे उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. सोमवारी पंचवटी एक्स्प्रेस सहा तास उशिराने धावली तर राज्यराणी, मुंबई-भुसावळ व पुणे भुसावळ रेल्वे रद्द करण्यात आल्याने नाशिककर व खान्देशला जाणाºया प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.मध्य रेल्वेच्या नव्या तिसºया मार्गासाठी रूट रिले इंटरलॉकिंग पॅनल व इगतपुरी रेल्वेस्थानकात यार्ड रिमोल्डिंगच्या कामासाठी गेल्या महिनाभरापासून ब्लॉक घेण्यात आल्याने काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. मनमाडवरून पंचवटी एक्स्प्रेस रविवारी ब्लॉकमुळे मनमाड-दौंड-पुणे- कल्याण मार्गे मुंबईला गेली होती. रविवारी सायंकाळी मुंबईवरून सुटलेली पंचवटी एक्स्प्रेस पुन्हा कल्याण-पुणे-दौंड मार्गे मनमाडला तिच्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने पोचत सोमवारी १० वाजता पोहचली. यामुळे सोमवारी दुपारी १२ वाजता पंचवटी एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेपेक्षा सहा तास उशिराने धावत दुपारी एक वाजेच्या सुमारास नाशिकरोडला पोहचली.पंचवटी सहा तास उशिरापंचवटी एक्स्प्रेस उशिराने तर राज्यराणी रद्द झाल्याने व्यापाºयांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय मुंबई-भुसावळ पॅसेंजर व पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने नाशिक शहर-जिल्ह्यातून दिवाळीनिमित्त खान्देश भागात जाणाºया प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती. रेल्वे प्रशासनाने विविध कामांसाठी ब्लॉक घेतला असल्याने लांब पल्ल्याच्या येणाºया-जाणाºया गाड्या उशिराने धावत आहेत.
विलंबाने धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 1:40 AM