देवळा : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजीनगर परिसरातील मोबाइल टॉवरजवळ वाढलेली झुडपे आणि अस्वच्छतेमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी सदर टॉवर हटविण्याची मागणी नगरपंचायत प्रशासनाकडे केली आहे.देवळा-विठेवाडी रस्त्यावर मध्यवर्ती ठिकाणी असलेले विद्यानगर, शिवाजीनगर ही उपनगरे विकसित होत आहेत. शहरात विविध कंपन्यांचे सहा मोबाइल टॉवर उभारण्यात आलेले आहेत. टॉवरमुळे होणारे किरणोत्सर्जन आणि त्याचा सजीवांवर होणारा दुष्परिणाम हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सदर टॉवर उभारताना संबंधित कंपन्यांकडून मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. मोबाइल टॉवर उभारताना गर्दीच्या ठिकाणापासून तसेच शाळा, रु ग्णालय यापासून शंभर मीटर अंतरावर असावा असे नियमावलीत सांगितले आहे, परंतु त्याचे पालन झालेले दिसत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शिवाजीनगर परिसरात असलेला टॉवर नागरी वसाहतीत असून, तो इमारतींनी घेरलेला आहे. टॉवरच्या परिसरात रु ग्णालये आहेत. तसेच टॉवरवर देखरेख करण्यासाठी चौकीदाराची नेमणूक करण्यात आलेली नाही. कॅबिन मोडकळीस आली आहे. टॉवर असलेल्या जागेची स्वच्छता केली जात नाही. टॉवरसाठी बांधलेल्या संरक्षक भिंतीची दुरवस्था झाली असून, प्रवेशद्वार मोडकळीस आले असल्याच्याही तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. सदर टॉवरबाबत संबंधित कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
देवळ्यात भरवस्तीतील मोबाइल टॉवर हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 4:54 PM
नागरिकांची मागणी : अस्वच्छता, संरक्षक भिंतीची दुरवस्था
ठळक मुद्देटॉवर असलेल्या जागेची स्वच्छता केली जात नाही. टॉवरसाठी बांधलेल्या संरक्षक भिंतीची दुरवस्था