शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
4
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
5
SSY की SIP…मुलीच्या भविष्यासाठी कुठे गुंतवावा पैसा, कनफ्युज असाल तर समजून कुठे मिळेल जास्त पैसा?
6
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
7
१६ दिवसांत ४८ लाख जोड्या अडकणार रेशीमगाठीत, ६ लाख कोटींची उलाढाल?
8
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
10
'कार्तिकी' यात्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाड्या, भाविकांसाठी मध्य रेल्वेचे नियोजन
11
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
12
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
13
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
14
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
15
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
16
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
17
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
18
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
19
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
20
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र

स्वत:हून अनधिकृत बांधकाम हटवत स्वखर्चाने कॉँक्रिटीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:55 AM

महापालिकेकडून अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली जात असतानाच कानडे मारुती लेन येथील रहिवासी व व्यापारी यांनी सामासिक अंतरात केलेले वाढीव बांधकाम स्वत:हून काढून घेत स्वखर्चातून रस्त्याचे कॉँक्रिटीकरण केले.

नाशिक : महापालिकेकडून अतिक्रमणविरोधी मोहीम राबविली जात असतानाच कानडे मारुती लेन येथील रहिवासी व व्यापारी यांनी सामासिक अंतरात केलेले वाढीव बांधकाम स्वत:हून काढून घेत स्वखर्चातून रस्त्याचे कॉँक्रिटीकरण केले.  जुने नाशिक म्हणजेच गावठाण परिसरात पार्किंग, वाहतूक कोंडी व त्यातून होणारे वाद या बाबी नित्याच्याच झाल्या आहेत. कानडे मारु ती लेन ही अरुंद आहे. याठिकाणी रहिवासी व व्यापाऱ्यांनी इमारतीचे बांधकाम करताना वाढीव जागेत ओट्यांचेही बांधकाम केले होते. त्यामुळे अगोदरच अरुंद असलेल्या गल्लीत वाहन कोंडी होण्याबरोबरच वाहनतळाचीही अडचण होत होती. महापालिकेकडून अतिक्रमणविरोधी कारवाई होण्यापूर्वी परिसरातील रहिवासी व व्यापारी यांनी एकत्र येत कानडे मारुती लेनमधील सात इमारतींचे १२ फूट नव्हे तर जवळपास ३ बाय ६० मीटर इतक्या जागेवरील वाढीव बांधकाम स्वेच्छेने काढून घेतले. शिवाय, स्वखर्चाने रस्त्याचे रु ंदीकरण व कॉँक्रि टीकरण करून परिसरातील वाहनतळ व वाहन कोंडीचा प्रश्न पूर्णत: निकाली काढला. वाढीव स्वरूपात बांधकाम केल्याची बाब मिळकतधारकांच्या लक्षात आल्यावर परिसरातील सर्व नागरिक व व्यापारी यांनी एकत्र येत सामंजस्याने आपापल्या इमारतींसमोरील वाढीव बांधकाम काढून घेतले. सदर बांधकाम स्वत:हून काढून घेण्यासाठी अ‍ॅड. अक्षय कलंत्री, विनोद पोफळे, विवेक कुलकर्णी, अतुल मानकर, विलास देवकर, अतुल लोहिते, सतीश धात्रक, चिमन साधवानी, अनिश लालवानी यांनी पुढाकार घेतला.रोहित्र हलविण्याची मागणीकॉँक्रि टीकरण व रस्ता रु ंदीकरणामुळे नाशिक मनपाचा एक पथदीप व महाराष्ट्र विद्युत मंडळाचे एक रोहित्र रस्त्यात आले आहे. याबाबत नागरिकांनी नाशिक मनपा व विद्युत मंडळ यांच्याकडे रीतसर निवेदन दिलेले असून, विद्युत रोहित्र तत्काळ इतरत्र हलविण्याची मागणी कार्यकारी अभियंता सवाईराम यांच्याकडे केली आहे. तसेच याबाबत आमदार देवयानी फरांदे यांचीदेखील भेट घेऊन सदर समस्या मांडली असता त्यांनीही व्यक्तिश: लक्ष घालून सदर रोहित्र इतरत्र हलविण्यास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका