नाशिक, दि. 11 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येथील इगतपुरी येथील शिबीरामध्ये दहा दिवसांचे ध्यानधारणा करणार आहेत. यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या इगतपुरी येथील विपश्यना विश्व विद्यापीठात आज संध्याकाळी दाखल झाले आहेत.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याआधी सुद्धा अनेक ठिकाणी असलेल्या विपश्यना केंद्रात जाऊन धान्यधारणा शिबीरमध्ये भाग घेतला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नाशिकमधील इगतपुरी येथील विपश्यना विश्व विद्यापीठात पहिल्यांदाच आले आहेत. याठिकाणी असलेल्या निसर्गरम्य परीसरात ते जवळपास 10 दिवस ध्यानसाधना करणार आहेत.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विमानाने मुंबई आले. त्यानंतर मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करत इगतपुरी येथे संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास दाखल झाले. येथील धम्मगिरीच्यावतीने व्यवस्थापक सावलाजी यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच, यावेळी उपविभागीय अधिकारी राहुल पाटील, नगरसेवक नईम खान, रिपाइंचे सुनील रोकडे आदी उपस्थित होते.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करणार इगतपुरीत दहा दिवस ध्यानधारणा !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 8:27 PM