नाशिकरोड : रेल्वे प्रवाशांना देण्यात येणाºया सुविधांची पाहणी करण्यासाठी दिल्लीच्या रेल्वे बोर्डाची प्रवासी सेवा समिती सोमवार, दि. ११ रोजी नाशिकरोड स्थानकाची पाहणी करणार आहे. अनेक वर्षांनंतर अशी समिती नाशिकला भेट देत आहे.सकाळी ११ वाजता समितीचे सदस्य नाशिकला येतील आणि अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर समिती स्थानकाची पाहणी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. माजी खासदार लालबिहारी तिवारी हे समितीचे अध्यक्ष आहेत. यावेळी भुसावळ रेल्वे विभागाचे व्यवस्थापक आर. के. यादव व अन्य अधिकारी उपस्थित रहाणार आहेत. समिती येणार असल्याने रेल्वेस्थानक, रुळ, परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. स्थानकातील तिकीट विक्री बुकिंग, स्वच्छता, पाणी, कॅन्टीन आदी सुविधांची पाहणी समिती करणार आहे. सायंकाळी जनशताब्दी एक्स्प्रेसने समिती औरंगाबादला रवाना होणार आहे. प्रवासी सुविधा आणि स्वच्छतेबाबत नाशिकरोडस्थानक देशात दोन वर्षे पहिल्या सहामध्ये होते. गेल्या वर्षी हा क्रमांक १६९ वर गेला. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनातर्फे युद्धपातळीवर स्थानकाची स्वच्छता, दुरु स्ती, किरकोळ रंगरंगोटी, रुळांवर औषध फवारणी आदी कामे करण्यात आली.
दिल्लीची समिती करणार पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:43 AM