शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 11:53 PM

येवला : जगात कोणताही आधार न उरल्याने रस्त्याच्या कडेला राहून व भिकेचे कटोरे हातात घेऊन गुजराण करणाऱ्या दाम्पत्याने शरीर थकल्यावर जगाचा निरोप घेतला. कसेबसे दिवस कंठताना त्यांची जी कुतरओढ होत होती, ती मृत्यूनंतर थांबल्याने ह्यमरणाने केली सुटका, जगण्याने छळले होतेह्ण या सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्या ओळी येवला शहरातील नागरिकांना स्मरल्या असाव्यात. दरम्यान, हे वृद्ध दाम्पत्य अखेरच्या प्रवासावेळीतरी निराधार ठरु नये यासाठी येथील सत्यशोधक मंडळाने पुढाकार घेत अंतिम संस्कार करुन माणुसकीचे दर्शन घडविले.

ठळक मुद्देमाणुसकीचे दर्शन : येवला येथे निराधार वृध्द दाम्पत्यावर अंत्यसंस्कार

येवला : जगात कोणताही आधार न उरल्याने रस्त्याच्या कडेला राहून व भिकेचे कटोरे हातात घेऊन गुजराण करणाऱ्या दाम्पत्याने शरीर थकल्यावर जगाचा निरोप घेतला. कसेबसे दिवस कंठताना त्यांची जी कुतरओढ होत होती, ती मृत्यूनंतर थांबल्याने ह्यमरणाने केली सुटका, जगण्याने छळले होतेह्ण या सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्या ओळी येवला शहरातील नागरिकांना स्मरल्या असाव्यात. दरम्यान, हे वृद्ध दाम्पत्य अखेरच्या प्रवासावेळीतरी निराधार ठरु नये यासाठी येथील सत्यशोधक मंडळाने पुढाकार घेत अंतिम संस्कार करुन माणुसकीचे दर्शन घडविले.शहरातील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील भिंतीलगत छोट्या खोपटात पंढरीनाथ रंगनाथ कोटमे व कौशाबाई पंढरीनाथ कोटमे हे वृध्द निराधार दाम्पत्य राहत होते. गेल्या अनेक दिवसांपासून सत्यशोधक मंडळाचे कार्यवाह भगवान चित्ते व त्यांचे कुटुंब शक्य तितकी मदत या वृध्दांना करीत होते. जोपर्यंत हातपाय चालत होते तोपर्यंत हे दाम्पत्य भिक्षा मागून आपली गुजराण करीत होते, परंतु अंथरुणाला खिळल्यानंतर त्यांची अवस्था अतिशय बिकट बनली होती.चित्ते यांनी या दाम्पत्यास भोजन, औषधोपचारासाठी मदत केली. परंतु दोन दिवसाच्या अंतराने या वृध्द दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रथम कौशाबाई व नंतर पंढरीनाथ यांनी जगाचा निरोप घेतला. त्या दोघांना कुणाचाही आधार आणि वारस नसल्याने आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल असा विचार करुन त्या दोघांचेही अंतिम संस्कार सत्यशोधक मंडळाने केले. भगवान चित्ते यांनी मुखाग्नी दिला. यावेळी नितीन संसारे, आनंद चित्ते, गणपतराव शिंदे, संदीप खरात, चंद्रकांत मंडलिक, अरविंद संसारे, रुग्णवाहिका चालक बंडू कवडे आदींनी मदत केली.फोटो- ०६येवला १- येवला येथे निराधार वृद्धाच्या अंत्यसंस्काराची तयारी करताना भगवान चित्ते, नितीन संसारे, आनंद चित्ते, गणपतराव शिंदे, संदीप खरात, चंद्रकांत मंडलिक आदी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक