सटाणा : शहराच्या हद्दीतील खासगी विहिरींतून होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची टँकरद्वारे मोठ्या प्रमाणत विक्री होऊन शहराबाहेर जात असल्याने संबंधित विहिरी शासनाने अधिग्रहित करून शहराचा पाणीप्रश्न सोडवावा, या मागणीसाठी नगरसेवक मुन्ना शेख यांनी तहसीलदार प्रमोद हिले यांना शुक्र वारी (दि.२६) साकडे घातले.दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेवल्याने सटाणा नगरपालिकेने दहा दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नगरपरिषद क्षेत्रातील आरम नदीकाठावरील शेतकºयांच्या विहिरींना चांगले पाणी असून, विहिरीचे मालक मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन शहरालगत असलेल्या आजूबाजूच्या गावांसाठी शेतीसाठी व घरगुती वापराकरिता दररोज दोनशे ते अडीचशे टँकर पाणी उपसा होत आहे. त्यामुळे शहरातील पाणीपातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने शहरातील खासगी व सार्वजनिक बोअरवेल तसेच नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा करणाºया विहिरींची भूजल पातळी घटली आहे.याचा परीणाम शहरामध्ये नोव्हेंबर महीन्यापासून पाणीटंचाई अधिक तीव्र होवू शकते यामुळे नागरीकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. शहरातील पाणीविक्र ी करणाºया विहिरींचा शोध घेवून त्या अधिग्रहीत करण्यात याव्यात तसेच बाहेरगावी जाणाºया पाण्याच्या टँकरचा शहरासाठी तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा. असे त्यांनी म्हटले आहे.यावेळी इलियास शेख, फारु ख शेख, अश्पाक शेख, यशवंत कात्रे, अकिल शेख, इब्राहीम शेख, तनवीर बागवान, मुजाहीद मान, जावीद मन्सुरी, वसीम शेख, फरहान कासी, हारून शेख, मोइनोद्दीन शेख, आवेज पठाण, तौसीफ शेख, तौसीफ खाटिक, जब्बार पटेल, मुजफील खान, परवेज पठाण, अफरोज शेख, सद्दाम शेख, नदीम शेख, आदी उपस्थित होते.फोटो कप्शन ;सटाणा शहराच्या हद्दीतील खाजगी विहिरी अधिग्रहीत करून सटाणा शहराचा पाणीप्रश्न सोडवावा याबबतचे निवेदन तहसीलदार प्रमोद हिले यांना देताना नगरसेवक मुन्ना शेख . समवेत इलियास शेख, फारु ख शेख, अश्पाक शेख, यशवंत कात्रे आदी.(फोटो २६ सटाणा)
विहिरी अधिग्रहित करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 1:27 AM