नाशिक : सोलापूर येथे माळी महासंघाचे अध्यक्ष शंकरराव लिंगे हे मागासवर्गीय आरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी व निवेदन देण्यासाठी जात असताना काही समाजकंटकांनी त्यांना काळे फासण्याचा व मारहाण करण्याचा प्रयत्न करून निवेदन देण्यापासून परावृत्त केले. लिंगे यांना धक्काबुक्की व काळे फासणाºया व्यक्तींना तत्काळ अटक करण्यात येऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, शिवाय अशा प्रकारच्या घटना भविष्यात कोणत्याही समाजाच्या व्यक्तीबाबत घडू नये याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी माळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. शंकरराव लिंगे मागासवर्गीय आयोगाकडे आपले निवेदन व लेखी म्हणणे मांडण्यासाठी जात असताना काही समाजकंटकांनी त्यांना काळे फासून मानहानी केली. त्यांच्यावर भ्याड हल्ला करणाºया समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी माळी समाज सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव तांबे, समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर क्षीरसागर, सामाजिक कार्यकर्ते योगेश कमोद, महेश गायकवाड, किशोर भास्कर, सचिन दप्तरे, शंतनू शिंदे, प्रवीण जेजूरकर, दत्ता ढोले, बाळासाहेब वाघ, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरु ण थोरात यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
लिंगे हल्ला प्रकरणी कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 12:19 AM