सातपूर : सातपूर औद्योगिक वसाहतीतील ग्रॅफाइट इंडिया (कार्बन कंपनी) कंपनीतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे आजूबाजूच्या रहिवासी भागात प्रदूषण होत असल्याने या कंपनीवर कायदेशीर करण्याची मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.ग्रॅफाइट इंडिया (कार्बन कंपनी) कंपनीतून बाहेर पडणाºया धुरामुळे त्यातून राखेचे बारीक कण उडतात. त्यामुळे शिवाजीनगर, कार्बननाका, धर्माजी कॉलनी, श्रमिकनगर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. प्रदूषण निर्माण करणाºया या कंपनीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक दिनकर पाटील, रवींद्र धिवरे, भाजप युवा मोर्चाचे चिटणीस अमोल पाटील तसेच दौलत पाटील, पुंजाराम थेटे, अमोल ईगे, अतुल पवार, अक्षय आहिरे, शुभम भामरे, प्रवीण डांगे, आकाश बागल, बंटी गोपाल, विशाल बुंदुले, रोशन पगार, श्रीराम कोठावदे, आदित्य कुडतरकर, अंकुश सावंत, प्रल्हाद डांगे, सागर देवरे, कारभारी शेवाळे आदींनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी संगेवार, उपप्रादेशिक अधिकारी अशोक करे, कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक देवीदास गोरे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, कार्यकारी अभियंता दर्शन ऊईके यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
प्रदूषणकारी कारखान्यावर कारवाईची करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:48 AM