नाशिक : जिल्हा रुग्णालयातील गर्भवती महिलेस वाईट वागणूक देणाºया महिला कर्मचा-यावर कठोर कारवाईची मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल संैदाणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़ जिल्हा रुग्णालयात स्वरूपा राजू वाघमारे ही गर्भवती बाळंतपणासाठी दाखल झाली होती़ तिच्याकडे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे़ गर्भवती महिलेकडे दुर्लक्ष केल्याने ती पलंगावरच प्रसूत झाली व बाळ मृत जन्मास आले़ यानंतर तिचे कुटुंबीय मृत बाळावर अंत्यसंस्कारासाठी गेले असता जिल्हा रुग्णालयातील मदतनीस कर्मचारी मीरा चिखले हिने चक्कर येत असलेल्या स्वरूपाकडून स्वच्छता करून घेतली़ राष्ट्रवादी महिला काँग्रेस व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने महिला कर्मचारी चिखलेवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे़ यावेळी नाशिक शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष अनिता भामरे, कार्याध्यक्ष सुषमा पगारे, नगरसेवक समिना मेमन, शोभा साबळे, विभागीय अध्यक्ष सलमा शेख, पुष्पा राठोड आदी उपस्थित होते़
जिल्हा रुग्णालयातील ‘त्या’ कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:20 AM