निफाड : तालुक्यात रेशन धान्य दुकानातील धान्य नियमानुसार वाटप करावे अशा आशयाचे निवेदन अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने निफाडच्या पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की सध्या अनेक गावांमध्ये रेशन धारकांना नियमानुसार जे धान्य वाटप करायचे आहे. त्याऐवजी कमी धान्य दिले जाते आणि गोरगरिबांची घोर फसवणूक केली जात आहे. आणि सदर प्रकरणाचा जाब विचारला असता सदर रेशन दुकानदारांकडून अरेरावीची भाषा केली जाते.रेशन वाटपासाठी महिन्याचे ३० दिवस नेमून दिलेले असताना गावागावांमध्ये रेशन दुकानदार त्यांचा मनमानी कारभार चालवतात आणि महिन्यातील तीन-चार दिवस किंवा पाच-सहा दिवस रेशन वाटप करतात, त्यामुळे त्याचा मोबदला ज्या गरजूंना पाहिजे व ज्यांना गरज आहे, त्यांना मिळत नाही.यापुढेही रेशन वाटप व्यवस्थित रित्या झाले नाहीतर छावा संघटनेच्या वतीने आंदोलन करेल असे निवेदनात म्हटले आहे.