सिन्नर तालुका दुष्काळी जाहीर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 05:57 PM2018-10-18T17:57:11+5:302018-10-18T17:58:01+5:30
सिन्नर तालुका त्वरित दुष्काळी जाहीर करावा तसेच पिण्याच्या पाण्याचे टॅँकर व जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी तहसीलदारांकडे तालुका युवक कॉँग्रेसच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षी तालुक्यात कमी पाऊस पडल्यामुळे गावातील पाण्याचे स्त्रोत आटून गेले असून, विहिरीही कोरड्याठाक पडलेल्या आहेत. पाण्याअभावी खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेलेला आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनावरांसाठी चारा छावण्या व टंचाईग्रस्त वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टॅँकर सुरू करावेत, अन्यथा आक्रमक पवित्रा घेण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिनेश चोथवे, सरचिटणीस प्रशांत ओगले, जिल्हा उपाध्यक्ष शरद शिंदे, युवक कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शेळके, उपाध्यक्ष पवन मुठाळ, विष्णू आव्हाड, शुभम खैरे, बबलू शेळके, अतुल पडोळ, विलास आव्हाड, राहुल नाजोड, ज्ञानेश्वर लोखंडे आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.