मनमाड : पांझनदेव ता. नांदगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला गेल्या अनेक महीन्यापासून शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्र ार येथील ग्रामस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्यधिकाऱ्यांकडे केली आहे.या शाळेतील सहावी व सातवीच्या वर्गासाठी शिक्षक नसल्याने याबाबत ग्रामस्थानी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्र ार करूनही या शाळेवर शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली नाही.विद्यार्थ्यांचे शैक्षणकि नुकसान होऊ नये यासाठी ग्रामस्थानी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्यधिकार्यांकडे तक्र ार केली आहे. या शाळेवर शिक्षक नियुक्त न केल्यास पंचायत समिती प्रांगणात विद्यार्थी बसवण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर संदीप डघळे, अण्णासाहेब पाटील, नितीन ढमाले, निलेश डघळे, दीपक थोरे आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत.
पांझनदेव प्राथमिक शाळेसाठी शिक्षक नियुक्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 6:23 PM
मनमाड : पांझनदेव ता. नांदगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला गेल्या अनेक महीन्यापासून शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्र ार येथील ग्रामस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्यधिकाऱ्यांकडे केली आहे.
ठळक मुद्देग्रामस्थानी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्र ार