नाशिकरोड : आघार बुद्रुक ढवळेश्वर येथे दलित वस्तीमध्ये घरात घुसून जाळपोळ, दगडफेक करून दलित युवकांंवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना त्वरित अटक करून कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे. रिपब्लिकन सेनेच्या वतीने विभागीय उपआयुक्त दिलीप स्वामी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दलित वस्तीवर जातीय द्वेषापोटी सामाजिक बहिष्कार टाकून त्रास दिला जात आहे. त्यामुळे समाधान हिरे यांचे जिल्हा परिषद सदस्य रद्द करावे, अपर पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, पोलीस कर्मचारी यांच्यावर कारवाई कारावी. आघार बुद्रुक ग्रामपालिका बरखास्त करून प्रशासक बसविण्यात यावा. नुकसान झालेल्या दलितांना भरपाई मिळावी, निरपराध दलितांवरील खोटे गुन्हे रद्द करा, समाजकंटकावर कारवाई करून शिक्षा करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर जिल्हा प्रमुख प्रकाश बागुल, ग्रामीण जिल्हाप्रमुख संजय दोंदे, युवा अध्यक्ष राजाभाई दोंदे, अमोल घोडे, विजय भालेराव, रविकांत भालेराव, उन्मेश थोरात, विलास गांगुर्डे, बापू लोखंडे आदींच्या सह्या आहेत.
दलित युवकांंवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांना अटक करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:52 AM