मालेगाव : मुलांना पळविणारी टोळी सक्रीय असल्याबाबतच्या अफवांवरून जनतेत पसरलेल्या गैरसमज दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे यांना जमियत उलमा-ए-मालेगावच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केले.१ जून रोजी शहरातील अली अकबर दवाखान्याजवळ घडलेल्या घटनेमुळे शहरात तणावाची स्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शहराची शांतता कायम राखण्यासाठी मुले पळविणाºया टोळीबाबत पसरलेला गैरसमज दूर होणे अत्यावश्यक आहे. म्हणून त्यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी.शहरातील प्रवेशमार्गावर पोलीसांची नेमणूक करुन लक्ष ठेवण्यात यावे, बसस्थानक, टॅक्सी स्टॅँडवर येणाºया भिकारींमुळे अशा ठिकाणी कायम पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा. शहरातील मेडिकलची तपासणी करुन कुत्तागोळी व इतर व्यसनाधिन औषधांची होणारी विक्री बंद करण्यात यावी, अशी मागणी मौलाना हमीद जमाली, कारी एकलाख अहमद, शाकीर शेख यांच्यासह सदस्यांनी केली आहे.
जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 1:25 AM
मालेगाव : मुलांना पळविणारी टोळी सक्रीय असल्याबाबतच्या अफवांवरून जनतेत पसरलेल्या गैरसमज दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीसप्रमुख संजय दराडे यांना जमियत उलमा-ए-मालेगावच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केले.
ठळक मुद्देबसस्थानक, टॅक्सी स्टॅँडवर येणाºया भिकारींमुळे अशा ठिकाणी कायम पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा.