शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

कमकोच्या कार्यक्षेत्राबाहेरील सभासद रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:41 PM

दि कळवण मर्चंट को-आॅप. बॅँकेतील कार्यक्षेत्राबाहेरील सभासद रद्द करावे, नूतनीकरण कोटेशन व निविदा प्रसिद्ध करावी, पाच संचालकांनी दिलेल्या राजीनाम्याचा खुलासा करावा व पोटनिवडणूक का घेतली नाही, असा प्रश्न कमकोचे माजी संचालक कैलास जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. दरम्यान, वैयक्तिक द्वेष व स्वार्थापोटी सभासदांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप कमको अध्यक्ष प्रवीण संचेती यांच्यासह संचालक मंडळाने केला आहे.

कळवण : दि कळवण मर्चंट को-आॅप. बॅँकेतील कार्यक्षेत्राबाहेरील सभासद रद्द करावे, नूतनीकरण कोटेशन व निविदा प्रसिद्ध करावी, पाच संचालकांनी दिलेल्या राजीनाम्याचा खुलासा करावा व पोटनिवडणूक का घेतली नाही, असा प्रश्न कमकोचे माजी संचालक कैलास जाधव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. दरम्यान, वैयक्तिक द्वेष व स्वार्थापोटी सभासदांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप कमको अध्यक्ष प्रवीण संचेती यांच्यासह संचालक मंडळाने केला आहे.जाधव यांचे प्रसिध्दपत्रक कळवण शहरातील सभासद व व्यावसायिक बांधवांना वाटण्यात येत असल्याने हा विषय सध्या शहरात चर्चेचा ठरला आहे.कमको बॅँकसंदर्भात माजी संचालक कैलास जाधव यांनी १९ जुलै २०१८ रोजी जिल्हा उपनिबंधक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कळवण तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या दि कळवण मर्चंट को- आॅप. बॅँकेच्या संचालक मंडळाने सन २०१५-१६ मध्ये कार्यक्षेत्राबाहेरील सभासद करून कर्जपुरवठा केला असल्याने त्यांचे सभासदत्व रद्द करावे, कमकोच्या पाच संचालकांनी सन २०१७ मध्ये राजीनामा दिल्याने पोटनिवडणूक घ्यावी व पोटनिवडणुकीनंतर बॅँकेचा नूतनीकरण सोहळा घ्यावा, संचालक मंडळाच्या नातेवाइकांना कर्जवाटप करण्यात आले आहे त्या प्रकरणांचा लेखापरीक्षणाची नियुक्ती करून चौकशी करावी. कमको बॅँकेच्या नूतनीकरण कामाची चौकशीकरावी, आदी पाच मागण्या केल्या आहेत.दरम्यान, कमको पदाधिकारी व संचालक मंडळाने लेखी तक्र ारींवर चर्चा करण्यासाठी जाधव यांना आमंत्रित केले होते. परंतु चर्चेचा प्रयत्न अयशस्वी झाला.कमकोचे माजी संचालक कैलास जाधव यांनी बॅकेकडे केलेली मागणी व प्रसिध्द केलेल्या मागणीमध्ये तफावत असून बॅँकेने तक्रारी अर्जानुसार मागणी केलेल्या मुद्द्याची तपशीलवार माहिती बॅँकेच्या प्रशासनाने लेखी स्वरु पात व टपालाद्वारे जाधव यांना दिली. मात्र त्यांनी ती माहिती स्वीकारण्यास नकार दिल्याचा गौप्यस्फोट कमकोचे अध्यक्ष प्रवीण संचेती व संचालक मंडळाने केला आहे.बॅँकेचा आलेख उंचावणारा : संचेतीकैलास जाधव यांच्या पत्रकामुळे सभासदांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जाधव यांनी बॅँकेकडे लेखी स्वरु पात केलेल्या तक्र ारी अर्जातील ५ मागण्या व प्रसिध्दपत्रकाद्वारे केलेल्या १२ मागण्या तथ्यहीन असून काही मुद्दे हे र्बंकेच्या कामकाज व भविष्यकालीन धोरणांचा भाग आहे. असे अध्यक्ष प्रवीण संचेती यांनी म्हटले आहे. मागण्यामधील मुद्दे बॅँकेच्या हिताचे असतील तर त्या मुद्याचा निर्णय संचालक मंडळ व प्रशासन निश्चित घेऊन अंमलबजावणी करेल. बॅँकेचे कामकाज पारदर्शी असून, आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावणारा आहे हे सभासदांना ते ज्ञात आहे. चौफेर होत असलेली प्रगती बघवली जात नसल्याने सभासदांची दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे, असे अध्यक्ष प्रवीण संचेती व संचालक मंडळाने सांगितले.

टॅग्स :bankबँक