लासलगांव : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीत गेल्या १५ दिवसांपासून कांदा दरात घसरण सुरू असून अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादनात घट झाल्याने मिळणारे दर हे शेतकरी वर्गाला परवडत नसल्याने केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यासह कांदा साठवणुकीची मर्यादा रद्द करावी, या करीता लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापदी सुवर्णा जगताप यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचेसह राज्याचे मुख्यमंत्री उदद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून विनंती केली आहे.सद्यस्थितीत समितीच्या लासलगांव मुख्य बाजारासह निफाड व विंचुर उपबाजार आवारात दररोज साधारणत: ३० ते ३५ हजार क्विंटल अर्ली खरीप कांद्याची विक्र ी होत आहे. परंतु माहे सप्टेंबर २०१९ पासून संपुर्ण देशभरात कांदा आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारातील कांदा दरवाढीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दि. २९ सप्टेंबर २०१९ चे अधिसूचनेनुसार भारतातून होणाऱ्या सर्व प्रकारच्या कांद्याचे निर्यातीस प्रतिबंध केला आहे. याशिवाय, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने दि. ३ डिसेंबर २०१९ चे आदेशानुसार देशभरातील घाऊक व्यापाऱ्यांना 250 क्विंटलपर्यत (२५ मे. टन) व किरकोळ व्यापाºयांना ५० क्विंटलपर्यंत (५ मे. टन) कांदा साठवणुकीची मर्यादा लागू केल्याने येथील व्यापारी वर्गास त्यांच्या दैनंदीन कांदा खरेदीवर बंधन आलेले आहे. वास्तविक नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सद्यस्थितीत विक्र ीस येणा-या अर्ली खरीप कांद्याची टिकवण क्षमता ही कमी असल्याने येथील शेतक-यांना सदरचा कांदा शेतातून काढलेनंतर लगेच विक्र ी केल्याशिवाय कोणताही पर्याय राहत नाही. त्यामुळे येथील बाजार समित्यांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर सदरचा कांदा विक्र ीस येत आहे. लवकरच येथील बाजार समित्यांमध्ये लेट खरीप (रांगडा) कांदाही मोठ्या प्रमाणावर विक्र ीस येणार आहे. तसेच महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान व कर्नाटक या राज्यांमधील स्थानिक कांदाही बाजारात दाखल झाला असून मध्यंतरीच्या काळात केंद्र शासनाने परदेशातुन आयात केलेला कांदा महानगरांमध्ये दाखल झाल्याने देशांतर्गत मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर कांदा उपलब्ध होत असल्याने दिवसेंदिवस कांदा बाजारभावात घसरण होत आहे. त्यामुळे देशांतर्गत मागणी पुर्ण होऊन शिल्लक राहिलेला कांदा निर्यातीच्या माध्यमातून परदेशी बाजारपेठेत रवाना झाल्यास कांदा बाजारभावाची पातळी स्थिर राहणेस मदत होणार आहे.
कांदा निर्यातबंदी उठविण्यासह साठवणूक मर्यादा रद्दची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 6:54 PM
लासलगाव : बाजार समिती सभापतींचा केंद्राशी पत्रव्यवहार
ठळक मुद्दे लवकरच येथील बाजार समित्यांमध्ये लेट खरीप (रांगडा) कांदाही मोठ्या प्रमाणावर विक्र ीस येणार आहे