येवला : शेतमाल विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना रोख स्वरूपात देण्यात यावे, अशी मागणी येवला तालुका प्रहार शेतकरी संघटनेने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यात रोखीने शेतमालाचे व्यवहार होत असताना व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे लासलगावीच धनादेशाद्वारे शेतमालाचे पैसे दिले जात आहेत. वास्तविक सध्या पेरणीचा हंगाम असल्याने शेतकरी तातडीच्या गरजेपोटी आपला शेतमाल मिळेल त्या भावात विकून शेतीसाठी बियाणे, खते, मजुरी आदी खर्च भागविण्याच्या तयारीत आहे़या प्रकरणाची प्रहार संघटनेने गंभीर दखल घेतली असून, तातडीने रोखीने व्यवहार सुरू न केल्यास प्रहारतर्फे आंदोलन छेडण्यातयेईल, असा इशारा प्रहारच्या वतीने बाजार समितीचे सचिव वहाडणे यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदनप्रसंगी प्रहार संघटनेचे चांदवड तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, येवला तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन, संघटक किरण चरमळ, उपाध्यक्ष वसंत झांबरे, पाटोदा शाखा अध्यक्ष गोरख निर्मळ उपस्थित होते. फक्त लासलगाव बाजार समितीत विकलेल्या मालाचे पैसे धनादेशाद्वारे अदा करीत असून, शेतकºयांना व्यापाºयांच्या आडमुठ्या धोरणामुळे माल विकूनही आठ ते दहा दिवस पैसे मिळण्याची वाट बघावी लागत आहे. ही माहिती प्रहार कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी बाजार समितीकडे विचारणा केली असता रक्कम हाताळताना कोरोना संसर्गाचे कारण सांगितले गेले.
शेतमालाचे पैसे रोख देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 8:46 PM
येवला : शेतमाल विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना रोख स्वरूपात देण्यात यावे, अशी मागणी येवला तालुका प्रहार शेतकरी संघटनेने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
ठळक मुद्दे रोखीने व्यवहार सुरू न केल्यास प्रहारतर्फे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा