नाशिक : आरटीई प्रवेशप्रक्रियेत शाळेच्या एक किलोमीटर परिसरातील विद्यार्थ्यांना पहिल्या सोडतीत प्राधान्य दिले जात असल्याने शहरातील सिडको भागातील नामांकित शाळांच्या एक किलोमीटरच्या परिघातील घरांना मागणी वाढली असून, अनेक पालाकांकडून या भागातील घरेभाडे कराराने घेण्याचा प्रयत्न होत आहे. विशेष म्हणजे अनेक पालकांनी या भागातील एकाच घराचे पत्ते त्यांच्या पाल्यांचे अर्ज दाखल करताना सादर केल्याचाही प्रकार समोर आला आहे.शिक्षण विभागाने लॉटरी लागल्यानंतर रहिवासाचा पुरावा सादर करण्याची संधी दिल्यामुळे पालक अशाप्रकारे आरटीई नियमातील त्रुटींचा गैरफायदा घेत असून, त्यामुळे संबंधित भाागातील संभावित लाभार्थी मात्र आरटीई प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडको आणि पाथर्डी फाटा परिसराला लागून असलेल्या सिम्बॉयसिस शाळेत आरटीई अंतर्गत ३० जागांवर पूर्व प्राथमिक म्हणजेच नर्सरीसाठी प्रवेश दिले जातात. त्यामुळे या भागातील हजारो पालक आॅनलाइन अर्ज करतात. परंतु आॅनलाइन अर्ज करताना एक किलोमीटरच्या बाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणे दुरापास्त झाले आहे. कारण शहरातील विविध भागांत राहणारे नागरिक या भागात केवळ मुलाला आटीईअंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी घरभाडे कराराने घेतात अथवा भाडे कराराचा करार करतात. यात अनेक गैरप्रकार समोर येत असून, या भागातील एकाच घराचा पत्ता दोन पालकांनी अर्ज भरतांना दिल्याचा प्रकार समोर आला आहे. यात अर्जक्रमांक १९ एनएच ०२०५९७ व १९एनएच०२४६२५ अर्जक्रमांकांमध्ये एन ३३, एल ६०२४, सह्याद्रीनगर सिडको नाशिक हा एकच पत्ता देण्यात आला असून रेखांश आणि अक्षांशानुसार (लॉगीट्यूड आणि लॅटीट्यूड) येणारे अंतरही सारखेच आहे. विशेष म्हणजे या दोन्ही अर्जदारांना आॅनलाइन लॉटरी प्रक्रियेत प्रवेशाची संधी मिळासी असल्याने लॉटरी प्रक्रियेविषयी साशंकता व्यक्त होऊ लागली आहे.आरटीई प्रक्रियेतील त्रुटींचा गैरफायदाआरटीई प्रवेशप्रक्रियेत आॅनलाइन लॉटरीची यंत्रणा असली तरी एकाच विद्यार्थ्यांचे दोन अर्ज शोधण्याची आणि एकाच पत्त्यावरील दोन अर्ज शोधण्याची यंत्रणा विकसित नाही. यापूर्वी एकाच विद्यार्थ्यांच्या जन्मतारखा बदलून दोन अर्ज दाखल केल्याचे समोर आल्यानंतर आता एकाच पत्त्याचा वापर करून दोन वेगवेळ्या विद्यार्थ्यांनी आरटीईसाठी अर्ज केल्याचा प्रकारसमोर आला आहे. त्यामुळे आरटीईच्या उद्देशालाच हरताळ फासला जात असून, आरटीईचे खरे लाभार्थी मात्र शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राण्याची भीती निर्माण झाली आहे.
सिडकोतील घरांना मागणी वाढली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:40 AM