मालेगाव : शहरातील द्याने, श्रीरामनगर, डी. के. कॉर्नर, सोयगाव नववसाहत, कॅम्परोड, बाराबंगला परिसरातील नागरिक नागरी समस्यांपासून त्रस्त आहेत. या भागात तातडीने स्वच्छता मोहिम राबवून नागरी सुविधा पुरवाव्यात अशी मागणीराष्टवादी युवक कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.शहरालगतच्या द्याने, श्रीरामनगरला जोडणाºया फरशी पुलाशेजारी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. परिसरातील नागरिक व शाळकरी विद्यार्थी वैतागले आहेत. सोयगाव नववसाहत भागातील भावसार कॉलनी परिसरात रस्ता नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. आनंदनगर, मोठाभाऊ नगर या भागातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. बाराबंगला परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.समर्पण रुग्णालया जवळ गटारीवरील ढापा तुटुन पडला आहे. मनपाने या भागात नागरी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी राष्टÑवादी युवक कॉँग्रेसचे महानगर अध्यक्ष दिनेश ठाकरे, तालुकाध्यक्ष संदीप पवार, माजी नगरसेवक अनंत भोसले, सागर पाटील, अनिल पाटील, विजय जगताप, रमेश लोखंडे, त्र्यंबक पाटील, गणपत सोनवणे, प्रशांत बच्छाव, अक्षय दरेकर, मयूर खैरनार, निखिल अग्रवाल, सचिन शेवाळे, बापूराव पवार, कुणाल कदम, विकी गांगुर्डे आदींनी केली आहे.
नागरी सुविधा पुरविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 11:09 PM
द्याने, श्रीरामनगर, डी. के. कॉर्नर, सोयगाव नववसाहत, कॅम्परोड, बाराबंगला परिसरातील नागरिक नागरी समस्यांपासून त्रस्त आहेत. या भागात तातडीने स्वच्छता मोहिम राबवून नागरी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी राष्टवादी युवक कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.
ठळक मुद्देमालेगाव : राष्टवादी युवक कॉँग्रेसचे मनपा आयुक्तांना निवेदन