अंदरसूल : दरवर्षी श्रावणी अमावास्येला पोळा सण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतकरी उत्साहाने साजरा करत असतात. यावर्षी १ सप्टेंबर गुरु वारी पोळा हा सण साजरा होणार आहे. त्याची तयारी सुरू झाली असून, ठिकठिकाणी कुंभार समाजात मातीचे बैल बनविण्याची लगबग सुरू झाली आहे. शेतातल्या बैलांबरोबर मातीच्या बैलांचेदेखील पूजन घराघरांत केले जाते. चाऱ्याची कमतरता आणि महागाई यामुळे ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांना सर्जा-राजाची बैलजोडी सांभाळणे कठीण झाले आहे. यांत्रिक मशागतीने शेती उभी केली जात आहे. येवला तालुक्याच्या सर्व भागात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ५० टक्के बैलांची संख्या कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे यावर्षी पोळा सणावर दुष्काळ व महागाईचे सावट राहणार आहे. कारण यंदा कांद्याने रडवले आहे. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला बळीराजा खरिपाच्या व आगामी रब्बीच्या पिकाकडे आस लावून बसला आहे. शेतकऱ्याच्या घरात पोळा सण साजरा उत्साहात होत असतो. बैलजोडी असो अथवा नसो, मातीच्या बैलांच्या पूजेलाही ग्रामीण भागात खूप महत्त्व आहे. गेल्या १० दिवसापासून येवल्याच्या ग्रामीण भागात मातीचे बैल बनवण्याचे काम सुरु असते, मातीच्या बैलांच्या एका जोडीची किंमत अंदाज े१२ ते २५ रू. जोडी इतकी आहे.सन उत्सव साजरे होत असतात.त्यामुळे बैलाच्या निर्मितीतून थोडी अर्थप्राप्ती होते असे मातीचे बैल तयार करणार्या कुटुंबाचे म्हणणे आहे.
मातीच्या बैलांची मागणी घटली
By admin | Published: August 28, 2016 10:26 PM