इन्फो ..
येवला नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची बहुतांशी पदे शासनाने २००६ मध्ये अस्थायी केली. त्यानंतर कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने पदे रिक्त होत गेले. परिणामी, कर्मचारी संख्या कमी होत गेली आहे. यात २०१८ मध्ये राज्यस्तरीय आकृतीबंध मंजूर करण्यात आला. त्या पाणी व स्वच्छता विभागासाठी एकच अभियंता पद मंजूर करण्यात आले; मात्र सद्यस्थितीला सदर पदही रिक्त असून, चांदवड नगर परिषदेचे अभियंता सत्यवान गायकवाड यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त भार आहे. पाणी पुरवठा विभागातील निम्मी पदे रिक्त असून, जलशुद्धीकरण केंद्रावरील कर्मचारी व वर्ग ४ चे कर्मचारी यासह रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांच्या भरवशावर पाणी पुरवठा विभागाचा कारभार सुरू आहे.
कोट...
पाणी पुरवठा विभागास कायमस्वरुपी अभियंत्यासह रिक्त असणारी पदे तत्काळ भरली जावीत. शहरवासीयांच्या आरोग्य हितासाठी जलशुद्धीकरण केंद्रातील आवश्यक ती कामे प्राधान्याने करावीत, तसेच पालिकेने विशेष मोहीम राबवून शहरातील नळाद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याची तपासणी करावी.
- दीपक भदाणे, सामाजिक कार्यकर्ते.
===Photopath===
250221\25nsk_47_25022021_13.jpg
===Caption===
येवला येथे नळाद्वारे पुरवठा होणारे दुषित पाणी.