इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, घोटी खुर्द येथील शेतकऱ्यांचे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने भात (धाण), नागली, वरई, भुईमूग, खुरसणी, उडीद ,सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या नुकसानीचे पंचनामे होऊन नुकसानग्रस्त गरीब शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी शासनाने तहसीलदार यांच्याकडे रक्कम सुपुर्द केली होती. प्रत्यक्षात आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळाली नसल्याने ती लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने नायब तहसीलदार सोनवणे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी कवडदरा येथील तालुका उपाध्यक्ष रमेश निसरड, घोटी खुर्द येथील सुभाषराव फोकणे, संपतराव रोंगटे, भाऊराव रोंगटे, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ रोंगटे उपस्थित होते.
इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 5:46 PM