लासलगाव : भारतीय स्टेट बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जातून विमा हप्ते कपात केले असल्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असल्याने शासनाने संबधित शाखांना सूचना देऊन शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे निफाड पंचायत समतिीचे उपसभापती शिवा सुरासे यांनी लेखी निवेदन देऊन केली आहेनिवेदनात म्हटले आहे की निफाड तालुक्यातील शेतकºयांनी भारतीय स्टेट बँक लासलगाव शाखेकडून कृषी कर्ज घेतले असून संबधित शाखेने शेतकºयांच्या पिक कर्जातून कोणतीही पूर्व सूचना न देता मार्च सन २०१९ या आर्थिक वर्षात पिक विमा कपात केला आहे. मागील वर्षी शेतकºयांच्या शंभर टक्के पिकांचे नुकसान झाले होते परंतु बँकेने तशी कोणतीही पूर्व सूचना संबधित शेतकºयांना त्या आर्थिक वर्षात दिलेली नव्हती.त्यामुळे संबधित शेतकºयांना कोणतीही नुकसान भरपाई बँकाच्या चुकामुळे मिळाली नाही. मार्च २०२० या आर्थिक वर्षात कर्ज भरून घेताना व रीनिव्हल करताना आपले पिक विमे कपात झाल्या असल्याचे शेतकर्यांना समजल्यामुळे शेतकर्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शासनाने या संबधित शाखांना सूचना देऊन शेतकर्यांना विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी शिवा सुराशे यांनी केली आहे.
विमा कंपन्यांकडून भरपाई देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 10:34 PM
लासलगाव : भारतीय स्टेट बँकेने शेतकऱ्यांच्या कर्जातून विमा हप्ते कपात केले असल्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात असल्याने शासनाने संबधित शाखांना सूचना देऊन शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याकडे निफाड पंचायत समतिीचे उपसभापती शिवा सुरासे यांनी लेखी निवेदन देऊन केली आहे
ठळक मुद्दे मार्च सन २०१९ या आर्थिक वर्षात पिक विमा कपात केला आहे.