येवला येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी सोपान कासार यांना देताना रयत क्र ांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक सांगळे.येवला : शेतकºयांना संपूर्ण कर्ज मुक्ती मिळावी यासह अन्य मागण्या तात्काळ मार्गी लावून शेतकºयांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी रयत क्र ांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाल्मिक सांगळे यांनी प्रांताधिकाºयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.लॉकडाऊनमुळे शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी, शेती पंपाचे वीज बिल माफ करावे, दुधाला प्रती लिटर ३० रु पये बाजारभाव मिळावा, बोगस सोयाबीन बियाणांमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करु न भरपाई तत्काळ मिळावी, शेतकºयांचा कापूस शेवटपर्यंत खरेदी करावा, कांद्याला प्रती क्विंटल ५०० रु पये अनुदान द्यावे, खासगी सावकार, बँक, फायनान्स यांच्या सक्त वसुलीवर बंदी घालावी, बँक अधिकाºयांचे आडमुठे धोरण बंद करावे, पीक कर्ज द्यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी सोपान कासार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्ज मुक्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 10:26 PM