खर्डे : देवळा तालुक्यातील खर्डे येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अपूर्ण इमारतीचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी बुधवारी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.देवळा तालुक्यात नाशिक जिल्हा विधायक कार्य समिती संचिलत, सटाणा या संस्थेच्या खर्डे येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या जुन्या इमारतीचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. याठिकाणी संस्थेने नवीन इमारत बांधावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून गावकर्यांनी केली आहे. याकडे संस्थाचालक दुर्लक्ष करीत असल्याने दोन वर्षांपूर्वी या शाळेला गावकºयांनी कुलुप ठोकले होते. याची दखल घेत गेल्या वर्षी काही नवीन वर्ग खोल्या बांधण्यास सुरवात करण्यात आली. मात्र सदर काम वर्षांपासून रेंगाळत पडल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.यावेळी प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तुभाऊ बोडके, अनिल भडांगे, प्रकाश चव्हान, कृष्णा जाधव, तुषार खैरनार, महेंद्र खैरनार आदी पदाधिकारी उपस्थित होते.आंदोलनाची दखल घेतली नाही काम पूर्ण करण्यासाठी मध्यंतरी प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांनी मुख्याध्यापकाना निवेदन देऊन मागणी केली होती. तरी देखील दखल घेतली जात नसल्याने आज नाशिक येथे प्रहारच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गीते यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तसेच माध्यमिक शिक्षण विभागात जाऊन शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्या रिकाम्या खुर्चीला या मागणीचे निवेदन चिटकवून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
विद्यालयाचे काम पूर्ण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 12:32 AM
खर्डे : देवळा तालुक्यातील खर्डे येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या अपूर्ण इमारतीचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी बुधवारी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या खुर्चीला निवेदन चिटकवून गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
ठळक मुद्देगांधीगिरी : शिक्षणाधिकाऱ्यांच्या खुर्चीला चिटकविले निवेदन