नाशिक : निमाणी बसस्थानकाची दुरवस्था झाली असून, सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी कॉँक्रिटीकरण करण्यात यावे, अशी मागणी वाल्मीकी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.निमाणी बसस्थानकात दररोज शाळा-महाविद्यालय व दैनदिन कामानिमित ये-जा करणाऱ्या कर्मचाºयांची संख्या मोठी असून, दिवसभर वर्दळ सुरू असते. मागील सहा महिन्यांपासून येथील बसस्थानकामध्ये धुळीचे साम्राज्य पसरले असून, प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक संघटनांनी व राजकीय पक्षांनीदेखील याबाबत परिवहन विभाग नियंत्रकांना निवेदन दिले आहे. बसस्थानकातील खड्डे बुजवून तत्काळ कॉँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी भारतीय वाल्मीकी समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे विभाग नियंत्रकाकडे केली आहे. निवेदनावर संघटनेचे महानगरप्रमुख अजय तसांबड, आशिष दलोड, सुरज कागडा, सिद्धांत दलोड, आदित्य तसांबड, राकेश पाखळे, राहुल राठोड आदींच्या स्वाक्षºया आहेत.अनेक गैरसोयीपंचवटी आगारातून निमाणी बसस्थानकात सर्व शहर बस येतात. निमाणी बसस्थानकातून शहराच्या विविध भागात बस जातात.या ठिकाणी सर्वच भागात बस जात असल्याने प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. या बसस्थानकात पुरेसे प्रवासी शेड नसल्याने प्रवाशांना उन्हातच उभे राहावे लागते. बस एका रांगेत उभ्या नसतात. अनेक प्रवासी चालू बसमागे पळत असल्याने काही वेळा अपघात होतात. त्यामुळे बस व्यवस्थित लावाव्यात.