खर्डे : खर्डे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील कोलथी नदीला दुथडी पाणी असल्यामुळे या नदीच्या पलीकडे असलेल्या आदिवासी वस्ती व शिवारातील नागरिकांची येण्या जाण्यासाठी मोठी गैरसोय निर्माण झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन याठिकाणी पूल बांधण्यात येऊन गेल्या अनेक वर्षांपासूनची होत असलेली गैरसोय दूर करावी, अशी मागणी आदिवासी वस्तीवर व परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे. खर्डे येथील कोलथी नदी असून, या नदीच्या पलीकडे आदिवासी वस्ती तसेच गावातील बहुतांश शेतकरी वास्तव्यास आहेत. या नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो यामुळे येथील रिहवाशांचा गावाशी संपर्क तुटतो. तसेच शाळेत जाणाºया येणाºया विद्यार्थ्यांची ही गैरसोय होते. नदीचे पाणी ओसरल्यावर जीव मुठीत धरून नदीच्या पाण्यातून मार्गक्र मण करावा लागतो. नदीवरून पायी जाणे तर दूरच मोठे वाहन देखील जात नसल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्र ीसाठी घेऊन जातांना मोठी गैरसोय निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे. तसेच लोकप्रतिनिधी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप समस्या ग्रस्त नागरिकांनी केला आहे. तरी संबंधीत विभागाने याची दखल घेऊन या नदीवर पूल बांधण्यात येऊन येथील रिहवाश्यांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रहारचे भाऊसाहेब मोरे, रमेश देशमाने आदींनी केली आहे. दरम्यान, नदी काठावरील वस्तीवर आजी माजी पंचायत समितीचे सभापती, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे लोकप्रतिनिधी वास्तव्यास आहेत. गावाचा गाडा हाकलणाºया या पदाधिकाºयांना ही गंभीर समस्या वर्षानुवर्ष भेडसावत असून ही शोकांतिका आहे. व निवडणुकीसाठी फक्त आमचा वापर करून आमची ही समस्या आमदार, खासदारांपर्यंत कोणी पोहचवत नसल्याची खंत व्यक्त केली जात असल्याची माहिती प्रहारचे पदाधिकारी कृष्णा जाधव, भाऊसाहेब मोरे, बापू किसन देवरे यांनी दिली.
कोलथी नदीवर पूल बांधण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 4:34 PM
खर्डे : खर्डे परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील कोलथी नदीला दुथडी पाणी असल्यामुळे या नदीच्या पलीकडे असलेल्या आदिवासी वस्ती व शिवारातील नागरिकांची येण्या जाण्यासाठी मोठी गैरसोय निर्माण झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन याठिकाणी पूल बांधण्यात येऊन गेल्या अनेक वर्षांपासूनची होत असलेली गैरसोय दूर करावी, अशी मागणी आदिवासी वस्तीवर व परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.
ठळक मुद्देखर्डे : नागरिकांची गैरसोय निर्माण झाल्याने नाराजी व्यक्त