पेठचे तहसीलदार संदीप भोसले ब तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांना दिलेल्या निवेदनात विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खाती जमा करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
याप्रसंगी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राज्य युवा कार्याध्यक्ष गणेश गवळी, नेताजी गावीत, राहुल मानभाव, योगेश भांगरे आदी उपस्थित होते.
----------------------
खोकरतळे येथे लसीकरण मोहिमेस प्रतिसाद
पेठ -कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी पेठ तालुक्यातील खोकरतळे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोविड लसीकरण मोहिमेस नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
प्राथमिक आरोग्य केंद्र कुंभाळे अंतर्गत ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. सरपंच चंद्रभागा मोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती केल्याने लसीकरणास प्रतिसाद मिळत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते मनोहर मोंढे यांनी सांगितले.
----------------
पेठला दहा घरमालकांना प्रशासनाने दिली नोटीस
पेठ -पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असताना मान्सूनपूर्व खबरदारीचा व प्रतिबंधात्मक आपत्ती उपाययोजनेंतर्गत पेठ नगरपंचायत क्षेत्रातील जीर्ण झालेली व धोकादायक स्थितीत असलेली घरे दुरुस्ती किंवा काढून घेण्याबाबत घरमालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
मुख्याधिकारी यांच्या स्वाक्षरीने शहरातील दहा घरमालकांना नोटीस बजावत धोकादायक घरे दुरुस्ती करून घ्यावीत किंवा खाली करावीत असा आदेश बजावण्यात आला आहे.