पेठ : परिसरात दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पीक संकटात आल्याने पेठ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून पीकविमा योजनेला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.पंचायत समितीच्या माजी सभापती पुष्पा गवळी यांनी करंजाळी परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. पावसाअभावी नागली व वरई जळून खाक झाली असून, भाताची लावणी खोळंबल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. पावसाचे माहेरघर असलेल्या पेठ तालुक्यात यावर्षी जुलैअखेर केवळ २० टक्के पाऊस झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी पुष्पा गवळी, नंदू गवळी, पप्पू गुप्ता, भास्कर कडाळी, उत्तम कडाळी, वामन कडाळी, मनोज कडाळी, गणेश गवळी, धनराज गवळी, अनिल ठाकरे आदींनी केली आहे.
पेठ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 10:54 PM
पेठ : परिसरात दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पीक संकटात आल्याने पेठ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून पीकविमा योजनेला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
ठळक मुद्देकरंजाळी परिसरातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.