शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
6
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
7
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
8
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
9
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
10
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
11
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
12
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
13
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
14
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
15
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
16
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
17
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
18
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
19
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
20
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा

ब्राम्हणगावच्या ग्रामसभेत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 5:43 PM

बागलाण तालुका दुष्काळ जाहीर करावा व गावाची पन्नास पैशांच्या आत आणेवारी लावण्यात यावी . गावांत पूर्णवेळ तलाठी द्यावी, सिंगल फेज योजना राबवावी आदी मागण्या ब्राम्हणगाव ग्रामस्थांनी ग्रामसभेत केल्या.

ब्राह्मणगांव : बागलाण तालुका दुष्काळ जाहीर करावा व गावाची पन्नास पैशांच्या आत आणेवारी लावण्यात यावी . गावांत पूर्णवेळ तलाठी द्यावी, सिंगल फेज योजना राबवावी आदी मागण्या ब्राम्हणगाव ग्रामस्थांनी ग्रामसभेत केल्या. दरम्यान ग्रामस्थांनी थकीत घरपट्टी व पाणीपट्टी दहा दिवसाच्याआत न भरल्यास नळ पाणी पुरवठा खंडीत केला जाइल, असा इशारा सरपंच सरला आहीरे यांनी ग्रामसभेत बोलतांना दिला.  येथील बाजार चौकात महादेव मंदिर ओट्यावर ग्रामसभा खेळीमेळीत संपन्न झाली. अध्यक्षस्थानी सरपंच सरला अहीर होत्या. ग्रामविकास अधिकारी पी.के.बागुल यांनी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत गावांत साफसफाई, चौकाचौकात स्वच्छता असणे गरजेचे असल्याचे सांगितले, पायाभूत सर्वेक्षण,पंतप्रधान घरकुल आवास योजना, कृषी विभाग अंतर्गत शेतकऱ्यांसाठीच्या योजनेची माहिती दिली. त् यानंतर हायस्कूल जवळील धांद्री रोड व उत्तर दिशेकडील वास्तव्यास असलेले शेतकºयांनी रात्रीच्या वेळी सिंगलफेज वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी मधुकर अहीरे यांनी केली, रात्रीच्या वेळी गाडी चोरी जाणे,बिबट्या ची दहशत ,रात्री अपरात्री तब्येत बिघडली असता दवाखान्यात जाण्यासाठी शेतशिवारातुन गावांत जावे लागते, परंतु वीजपुरवठा नसल्याने रात्र अंधारातच काढावी लागते. याबाबत वेळोवेळी महावितरणला निवेदन देऊनसुध्दा जाग येत नसल्याने ग्रामसभेत ठराव करून रात्रीच्या वेळी सिंगलफेज वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. रिपाइंचे बागलाण तालुकाध्यक्ष बापुराज खरे यांनी दिल्ली येथे समाज कंटकानी संविधानाची प्रत जाळल्याप्रकरणी मुख्य आरोपींना त्वरीत अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. याबाबत ठराव करण्यात आला, बागलाण रिपाइंतर्फे व ग्रामस्थांनी याप्रकरणी जाहीर निषेध केला.कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तसेच ग्रामपंचायत सदस्य किरण अहीरे,व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव अहीरे यांनी बागलाण तालुका दुष्काळ जाहीर करण्याची व गावाची पन्नास पैशांच्या आत आणेवारी लावण्याची मागणी केली. गावांत पूर्णवेळ तलाठी नसल्याने नव्याने पूर्णवेळ तलाठी देण्याची मागणी ज्ञानदेव अहीरे,माजी सरपंच सुभाष अहीरे यांनी केली. रेशन मिळत नसलेल्या नागरीकांनी ग्रामपंचायतीकडे नोंदणी करावी असे ग्रामविकास अधिकारी पी.के  बागुल यांनी सांगितले. सरपंच सरला अहीरे यानी आपल्या भाषणात ग्रामस्थांनी थकीत घरपट्टी व पाणीपट्टी दहा दिवसाचे आत न भरल्यास नळ पाणी पुरवठा खंडीत केला जाइल ,तेव्हा कटु कारवार्त्त टाळण्यासाठी ग्रामस्थांणी वेळेवर थकीत घरपट्टी व पाणी पट्टी भरण्याचे आवाहन केले. दिव्यांग,अपंग,विधवा,व जनरल मधील वंचित लाभार्थींना पंतप्रधान घरकुल योजनेचा पाठपुरावा करून मार्गी लावण्याचे धर्मा पारखे यांनी सांगितले.  यावेळी सरपंच सरला अहीरे यांनी गावांत प्लॅस्टिक बंदीची अंबलजावणी करण्यासाठी व्यावसायिक दुकानदार, घरात वापरात येणारे प्लॅस्टिक पिशवी वापरण्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगत स्वच्छ गांव सुंदर गांव करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा व सहकार्य करण्याचे आवाहन केले.  याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य विनोद अहीरे, प्रभाकर बागुल, माजी उपसरपंच अनिल खरे, गोटू पगार,जगदीश अहीरे, विठाबाई अहीरे, सामाजिक कार्यकर्ते बापू अहीरे,बाळासाहेब अहीरे,आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी,आरोग्य सेविका, आशा,अंगणवाडी सेविका, संस्थेचे पदाधिकारी, महावितरणचे कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी किशोरवयीन मुलींना शासनाच्या विविध योजना घराघरात पोहचवून शिक्षण देण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. कार्यक्र माचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी पी.के.बागुल यांनी केले तर उपस्थितांचे आभार सरपंच सरला अहीरे यांनी मानले.

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळ