नाशिक : महापालिकेच्या अंदाजत्रक पत्रकात अपंगांसाठी तरतूद केली जात नाही आणि केली तर खर्च केली जात नाही म्हणून महापालिकेवर अनेक मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली, परंतु त्यानंतर प्रशासनाने अनेक योजना जाहीर करूनही प्रतिसाद मिळत नसून त्यामुळे पुन्हा पुन्हा आवाहन करावे लागत आहे. आताही महापालिकने ३१ आॅक्टोबर पर्यंत संपर्क करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकाच्या एकूण रकमेपैकी पाच टक्के रक्कम दिव्यांगासाठी राखीव ठेवण्याचा कायदा आहे. परंतु महापालिका वर्षानुवर्षे हा निधी खर्च करीत नसल्याची तक्रार आहे. गेल्या वर्षी महापालिका आयुक्तपदी अभिषेक कृष्णा असताना आमदार बच्चू कडू यांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी आयुक्तांशी चर्चा करताना असताना त्यांच्याशी वाद झाल्याने कडू यांनी हात उगारला होता. याप्रकरणी कडू यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली होती, मात्र त्यानंतर आयुक्त कृष्णा यांनी धडा घेतला आणि दिव्यांगांच्या योजनाचा धडाका लावला तो अजूनही सुरूच असून दिव्यांगासाठी विविध योजना घोषित करण्यात आल्या आहेत.महापालिकेने सध्या कर्णबधिरांना शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य, दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य, प्रौढ बेराजेगार दिव्यांगांना अर्थसहाय्य योजना तसेच दिव्यांगासाठी शिष्यवृत्ती व व्यावसायिकांना अर्थसहाय्य योजना असून, साधने आणि तंत्रज्ञान मदतीसाठी योजना आहेत.सक्षमीकरणासाठी मदतदिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्थांना सक्षम करणाºया संस्थांच्या सक्षमीकरणासाठीदेखील मदत केली जाणार आहे महापालिकेने यासंदर्भात दोनदा आवाहन करूनदेखील प्रतिसाद न मिळाल्याने आता पुन्हा एकदा आवाहन करीत ३१ आॅक्टोबरपर्यंत लाभ घ्यावा, असे उपआयुक्तहरिभाऊ फडोळ यांनी कळवले आहे.
मागण्यांसाठी आंदोलने, प्रतिसाद थंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 1:20 AM