विंचूर : गत रब्बी हंगामातील कांद्याचे अनुदान शेतकº्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. भा.ज.पा. ओ.बी. सी. मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे, लासलगाव जि.प.सदस्य ज्ञानेश्वर जगताप, चांदवड न.प.चे. नगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. दि.२१ जुलै रोजी नेस्को गोरेगाव (पु) येथे झालेल्या भा.ज.पा.च्या विशेष कार्य समितीच्या बैठकीत सदर निवेदन देण्यात आले. निवेदनात सन२०१८-२०१९ च्या रब्बी हंगामात कांद्याचे विक्र मी उत्पादन झाले. परीणामी बाजार भाव कोसळले.बाजार भाव कोसळल्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला. या शेतकº्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नोव्हेंबर, डिसेंबर २०१८ व जानेवारी, फेब्रुवारी २०१९ या कालावधीत विक्र ी केलेल्या कांद्यास २०० रूपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केले होते. सदर अनुदान काही शेतकºयांच्या खात्यावर जमा झाले. तर काही शेतकरी अजुनही अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. या उर्विरत शेतकº्यांचे अनुदान त्वरित त्यांच्या खात्यावर वर्ग करावे. अशी मागणी करण्यात आलेली आहे.
कांद्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 6:27 PM